Yashomati Thakur SIT demand details : अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. दरम्यान, या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आमदारभाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) व आयजी (अमरावती रेंज) यांची भेट घेतली. यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
"अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.