KDMC News  Saam TV
मुंबई/पुणे

KDMC Issue number for potholes Complaint : कल्याण-डोंबिवलीकर खड्ड्यांमुळे त्रस्त; तक्रारींसाठी केडीएमसीने जारी केला टोल फ्री नंबर

KDMC News : टोल फ्री नंबरवर खड्ड्यांची माहिती दिल्यास तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News : कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. शहरात पडलेले खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने 18002330045 टोल फ्री नंबर जारी केला आहे.

या नंबरवर फोन करून नागरिकांनी खड्ड्याबाबत तक्रारी कराव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे. टोल फ्री नंबरवर खड्ड्यांची माहिती दिल्यास तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केलं आहे. (Latesst Marathi News)

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर पडलेला खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ही कामे संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Latest News)

त्यानंतर आता केडीएमसीने खड्डयांच्या तक्रारींसाठी आता 18002330045 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून खड्डयांविषयी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागामार्फत करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस  (Heavy Rain) पडत असल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खड्डे भरण्याचे काम सातत्याने सुरु असून पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अडचणी निर्माण होत असल्याचे महापालिकेने स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडकरांनी घेतला चित्तथरारक घोडेस्वारी प्रदर्शनाचा आनंद

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT