रणजीत माजगावकर
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये मागील १२ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे राधानगरी धरण 96 टक्के भरलं आहे.
राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे स्वयंचलित दरवाजे उघडून भोगावती नदीत पाणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसणार आहे. (Latesst Marathi News)
याशिवाय पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या गावांना देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये जाऊन गावं खाली करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. (Latest News)
कोल्हापूर जिल्ह्यातील 28 पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. या शाळांचा वापर निवारा केंद्रासाठी करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.