Mithi River News: मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नदीतील गाळ काढण्यावर किती खर्च झाला, याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.
Mithi River
Mithi RiverSaam tv
Published On

Mumbai News: पावसाळी अधिवेशनात आज मुंबईतील मिठी नदीवर चर्चा झाली. ही चर्चा 2005 पासून 2023 पर्यंत नदीचं सौंदर्य आणि नदीतील गाळ काढण्यासाठी किती खर्च झाला, यावर झाली. या चर्चनंतर या नदीतील गाळ काढण्यावर किती खर्च झाला, याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. (Latesst Marathi News)

मिठी नदीतील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोापारवरून विरोधक आणि सत्तांधाऱ्यांमध्ये सभागृहात एकच खडाजंगी झाली. विरोधकांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. संबंधित काम मुंबई महानगर पालिका आणि एमएमआरडीए यांच्याकडे होतं.

Mithi River
Mumbai Railway Station: IRCTC ची वेबसाईट बंद पडल्यानंतर रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागात सुरु केले अतिरिक्त तिकीट काउंटर

दरम्यान, मिठी नदी रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणावरून अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात खडाजंगी झाल्याचं सभागृहात पाहायला मिळालं. मंत्री सभागृहात खोटी माहिती देत आहेत. खोटी माहिती घेऊन मंत्री सभागृहात येतात, असं म्हणत अनिल परब यांनी उदय सामंत यांना डिवचलं.

यानंतर उदय सामंत म्हणाले, ‘आम्ही उत्तर देताना कोणतीही खोटी माहिती देत नाही. आम्हालाही सभागृहात चार-चार वर्षांचा अनभव आहे. आम्हालाही सभागृहात बोलण्याचा अनुभव आहे’.

Mithi River
Mumbai Police Force recruitment: मुंबई पोलीस दलात कोणतीही कंत्राटी भरती होणार नाही; गृहविभागातील सूत्रांची माहिती

दरम्यान, मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केली. तसेच वर्ष 2005 ते 2023 पर्यंत नदीचा सौंदर्यासाठी किती खर्च झाला, तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार, असं उत्तर मंत्री सामंत यांनी आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com