Maharashtra Politics: बारामतीत महायुतीचा उमेदवार जिंकणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकणार असा दावा केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिल्याने राज्यातील राजकीय संपूर्ण समीकरण बदललं आहे. अजित पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या बारामतीत आगामी निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकणार असा दावा केला आहे. बावनकुळे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Mrathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर आहेत. भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील उमदेवार जिंकून आणण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे.

यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रवास योजना सुरू आहे. आज विनोद तावडेंनी 8 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. प्रत्येक मतदारसंघात 500 पदाधिकारी या मतदारसंघांमध्ये काम करणार आहेत’.

बावनकुळे पुढे म्हणाले, ‘अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यात येईल. 9090902024 या नंबरवर मिसकॉल देऊन मतदान नोंदणी सुरु आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील वाटतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत’.

‘आम्ही महाराष्ट्रातील ४५ जागा आम्ही जिंकू. महायुतीतील 12 नेते समन्वय समितीत काम करेल. प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती असेल. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना भाजप ताकद देईल. जिल्हा आणि तालुका स्तरावर समन्वय समिती काम करेल. बारामतीत महायुतीचा उमेदवार जिंकेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

‘महायुतीतील पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवतील. काँग्रेस पक्षात आपापसात संशयाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षात कधीही स्फोट होऊ शकतो. काँग्रेस आमदार संभ्रमात आहेत की, काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेता का ठरवू शकत नाही, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, ‘आम्ही कोणालाही पक्षप्रवेश द्यायला तयार आहोत. कोणी काँग्रेस नेत्यांनी आम्हाला स्वीकारण्याची तयारी दाखवली तर आम्ही त्याला पक्षात घेऊ. आजच्या बैठकीत आम्ही भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वय साधून 2024 साली 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे, असे बावनकुळे म्हणाले.

यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ‘उद्धव ठाकरेंची मानसिकता मनोरुग्ण असल्यासारखी आहे. कोणाला खेकडे म्हणणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांना त्यांचे बोलणे लखलाभ आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com