उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.
भाजपला पाच आणि शिवसेना-राष्ट्रवादीला मिळून पाच जागा मिळण्याची शक्यता.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमुळे निवडणुकीतील घडामोडींना वेग.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँक निवडणकीतून उमेदवारी अर्ज मागं घेतलाय. आरबीआयच्या सहकारी बँकांच्या 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या संचालकांच्या संदर्भातील एका नियमामुळं अडचण निर्माण होऊ नये या कारणामुळं उदयनराजे भोसलेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही अखेरच्या दिवशीच ठरलाय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपला ५ तर शिवसेना-राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत्यांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत. भाजपची स्वतंत्र बैठक सुरू आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक होतेय. आज अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने जिल्ह्याचे लक्ष अर्ज कोण माघारी घेणार याकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.