Kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमधील राजकारण तापलं; बॅनर फाडल्याने उमेदवारच रस्त्यावर बसला

kalyan Political news : कल्याणमधील राजकारण तापलं आहे. कल्याणमध्ये उमेदवाराचा पोस्टर फाडल्याने त्याने रस्त्यावर बसून ठिय्या केला.

Vishal Gangurde

कल्याण : विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकीय बॅनर फाडल्याने राकेश मुथा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट रस्त्यावर बसून त्यांनी ठिय्या केला.

या प्रकारानंतर राकेश मुथा यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी विरोधकांकडून बॅनर फाडले जात असल्याचा आरोप केला. काही कामे केली नसल्याने विरोधक असे कृत्य करत आहेत. तर बॅनर फाडून विजयी होता येत नाही. केडीएमसीकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत महापालिका अधिकारी हेतूपूर्वक त्यांच्याच बॅनर काढताय, असा गंभीर आरोप केला. केडीएमसीच्या कारवाईच्या निषेधार्थ मुथा यांनी रस्त्यावर बसून दोन तास ठिय्या दिला.

विधानसभा मतदारसंघात त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढले जात आहेत. यावरून केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचे राकेश मुथा यांनी सांगितलं.

आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आला. त्यानंतर मुथा यांनी मोहने परिसरात धाव घेतली. त्यांनी त्याठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन केले. बॅनर फाडणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. अनेक ठिकाणांहून त्यांचे बॅनर काढले जात आहे. त्याचा जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारल्यानंतर त्यांनी उत्तर न देता पळ काढला, यावरून मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुथा यांनी बॅनर फाडून कोणालाही निवडणूका जिंकता येत नाहीत. बॅनर फाडण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. विरोधकांना पराभव दिसून लागल्याने त्यांच्याकडून हे कृ्त्य केले जात आहे. एकीकडे बॅनर फाडले जात आहे, तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावत काम करीत आहे. माझा हेतूपूर्वक बॅनर काढला जात असल्याचा आरोप राकेश मुथा यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT