Ganpat Gaikwad Vs Mahesh Gaikwad  SaamTV
मुंबई/पुणे

Kalyan News: गणपत गायकवाड-महेश गायकवाड भिडले, त्याच जमिनीवरून पुन्हा राडा

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये ज्या जमिनीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड भिडले आणि गोळीबार कांड झाले आता त्याच जमिनीचा वाद पुन्हा चिघळला आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वे दरम्यान राडा झाला. पुन्हा दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांसह महेश गायकवाड यांचे बिल्डरवर आरोप तर बिल्डरने शेतकऱ्यांसह महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. महेश गायकवाड यांनी आरोप फेटाळत बिल्डर जमीन लाटत असल्याचा आरोप केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील द्वारली परिसरातील ज्या जमिनीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्या जमिनीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन दिवसांपूर्वी संबंधित बिल्डरकडून जागेचा सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांनी या सर्वेला विरोध केला. याबाबत महेश गायकवाड यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुन्हा या जागेवर राडा झाला. या झालेल्या वादानंतर हिललाईन पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या विरेधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून जागेवर दावा करण्यात आला आहे.

बिल्डरकडून जागेबाबत न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. ती जागा खरेदी केली आहे. आमच्याकडून खंडणी मागितली जाते. आमच्यासोबत गुंडागिरी केली जाते. आम्हाला सरकारने न्याय द्यावा असे सांगितले आहे तर शेतकऱ्यांनी ही जागा आमची आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तर महेश गायकवाड यांनी बिल्डरने केलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावलेत. त्यामुळे या जागेचा मालकी हक्कावरुन आता वाद चिघळण्याची शक्यता आहे.

याच जागेच्या मालकी हक्कावरुन गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. आमदार गायकवाड या प्रकरणात सध्या जेलमध्ये आहेत. संबंधित जागेवर बिल्डर जितेंद्र पारेख यांनी सोमवारी सर्वे सुरु केला होता. या सर्वे दरम्यान शेतकरी आणि बिल्डर पारेख यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. या प्रकरणात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिललाईन पोलिसांनी दोन्ही गटाविरेाधात गुन्हा दाखल केला आहे. जागेवर हत्यारे देखील मिळून आली होती. या प्रकरणात दोन्ही गटाकडून दावे केले जात आहेत.

एकीकडे शेतकरी एकनाथ जाधव यांच्या कुटुंबियांनी ही जागा आमची आहे. आमच्यावर अन्याय करुन जागा लाटली जात आहे. या जागेवरुन पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता. आता सर्वे करुन जागा लाटली जात आहे. सरकारने या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात जखमी बिल्डर जितेंद्र पारीख यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहे. पारिख यांनी या जागेबाबत कोर्टाने आमच्या बाजूने निकाल केला आहे. आमच्या जागेवर सर्वे होता. सर्वे करण्यासाठी गेलो होते. त्याठिकाणी महेश गायकवाड, राहूल पाटील आणि त्यांची साथीदार आले. महेश गायकवाड यांच्या हातात पिस्तुल होती. आमच्यासोबत दादागिरी केली गेली. आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला.

तसंच 'आमच्याकडे हत्यारे नव्हती. आमच्या बॉडीगार्डकडे लायसन्सधारी हत्यारे आहेत. जागेविषयी कोणताही विवाद नाही. जागा आमचीच आहे. या जागेचा जो काही मोबदला आहे. तो दिला आहे. आम्ही गुंडे बोलविले नाही. महेश गायकवाड हे गुंडगिरी करीत असून त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला. त्या शेतकऱ्यांवर एकच जागा तीन वेळा विकल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सरकारने न्याय द्यावा अशी मागणी केली. या प्रकरणी महेश गायकवाड यांनी जागा शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यासोबत दादागिरीकरुन जागा लाटली जात आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देणार. बिल्डरने आमच्यावर केलेला खंडणीचा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे सांगितले .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT