VIDEO: पावसामुळं उभं पीक आडवं झालं, शेतकरी बांधावरच ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Sambhajinagar Farmer Crying Video: हातातोंडाशी आलेलं मक्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्याने शेतातच उभं राहून हंबरडा फोडला. या शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतामधील पीक जमीनदोस्त झाली आहेत. बऱ्याच शेतामध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचले आहे. अशामध्ये पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मक्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्याने शेतातच उभं राहून हंबरडा फोडला. या शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतामध्ये डोलणारी पिकं पावसामुळे आडवी झाली. तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकं कुजायला लागली आहेत. बरीच मेहनत करून आपल्या मुलासारखं जपलेलं आणि सांभाळलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अक्षरश: हे शेतकरी ढसाढसा रडत आहेत. आपल्या शेताची अवस्था पाहून नाना भिका ठोंबरे या शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com