BJP on Election Commission  Saam tv
मुंबई/पुणे

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

BJP on Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ बसायला लागली आहे. विरोधी पक्षानंतर भाजप देखील निवडणूक यादीच्या घोळावर हरकत घेतली आहे.

Vishal Gangurde

केडीएमसी निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप

विरोधी पक्षानंतर भाजपने घेतला आक्षेप

भाजपने हरकत घेतल्याने चर्चांना उधाण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

kalyan : विरोधी पक्षांनी केडीएमसी निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप करत हरकती घेतल्या होत्या. पण आता सत्ताधारी भाजपनेही याद्यातील नावे दुसर्‍या प्रभागात टाकल्याने घोळ झाल्याची हरकत घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उचलल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजपचे कल्याण-डोंबिवलीचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून चुकीचे फेरबदल केले, असा सनसनाटी दावा केला.

सूर्यवंशी यांनी सांगितले की, ही प्रक्रिया आहे या याद्या २० तारखेला प्रसारित झाल्या असून २७ नोव्हेबर ही हरकती नोंदविण्याची शेवटची तारीख आहे एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही केवळ चुकून झालेली किंवा अपघाती चूक नसून जाणून-बुजून केलेला गैरप्रकार असल्याच त्यांनी सांगितले. भाजपला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सूर्यवंशी म्हणाले,सर्व चुका तातडीने दुरुस्त कराव्यात. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. निवडणूक पारदर्शक वातावरणात झाली पाहिजे, आणि जर या तक्रारी दखल घेतल्या नाहीत, तर भाजपकडून पुढील पावले उचलली जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अन्यथा भाजप कडून यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. त्याच बरोबर पॅनल क्रमांक ३ मधील १५ ते १६ हजार नावे ही पॅनल क्रमांक चार मध्ये टाकण्याची तक्रार भाजपचे टिटवाला मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT