Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

Nilesh lanke on malegaon case : मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
Nilesh lanke news
Nilesh lanke on malegaon case Saam tv
Published On
Summary

मालेगावातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट

मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया

सिंहगड किल्ल्यावरील ‘आपला गड, आपली जबाबदारी’ मोहिमेत नीलेश लंके सहभागी

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : भारतात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहेत.ज्येष्ठांपासून चिमुरड्या मुलीदेखील अत्याचाराला बळी पडत आहेत. महाराष्ट्राच्या मालेगावमध्येही चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील विविध भागात आंदोलने केली जात आहेत. मालेगावतील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सिंहगड किल्ल्यावर आपला गड, आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Nilesh lanke news
Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

'गड-किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे, असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले. यावेळी लंकेंनी महिलांवरील वाढत्या अत्याचार प्रकरणांवर भाष्य केलं. 'महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आता खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नीलेश लंकेंनी दिली आहे.

'आपला गड, आपली जबाबदारी' या मोहिमेवर भाष्य करताना नीलेश लंकेंनी सांगितलं की, 'गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा, यासाठी आम्ही या मोहिमेचा संकल्प केला आहे'.

Nilesh lanke news
Shocking : कुठे शीर तर कुठे धड सापडलं; विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, पोल्ट्रीफार्म मालकाला निर्घृणपणे संपवलं

खासदार लंके हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सामील

मोहीमेत स्वतः खासदार नीलेश लंके यांनी झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. किल्ल्यावरील प्रमुख परिसरात सौरदिवे, कचराकुंड्या, लोखंडी बाकडे आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले. पर्यटकांनी गडावर स्वच्छता राखावी, कचरा फेकू नये, अशी आवाहनपर पाट्याही लावण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com