Shocking : कुठे शीर तर कुठे धड सापडलं; विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, पोल्ट्रीफार्म मालकाला निर्घृणपणे संपवलं

Bihar Shocking : बिहारमधील पोल्ट्रीफार्म मालकाला निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
bihar crime news
bihar crimeSaam tv
Published On
Summary

दरभंगामध्ये पोल्ट्रीफार्म मालक गोलू कुमारची निर्घृण हत्या

गोलूचं धड आणि शीर वेगवेगळ्या ठिकाणी आढळलं

गोलूच्या मार्चमध्ये लग्न ठरलेलं, त्याआधीच हत्या

गोलूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

बिहारच्या दरभंगामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून पोल्ट्रीफार्म मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोल्ट्रीफार्म मालकाच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. २६ वर्षीय गोलू कुमार सिंह असे हत्या झालेल्या पोल्ट्रीफार्म मालकाचे नाव आहे. गोलू १५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्याचं शीर कापलेलं धड आढळलं. तर धड सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शीर आढळलं.

गोलू कुमार सिंह हा समस्तीपूर-दरभंगाच्या बॉर्डरवरील किशनपूर बैकुंठ या गावातला रहिवाशी होता. गोलू हा भरवाडी गावात पोल्टीफार्मचा मालक अचानक बेपत्ता झाला. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर त्याची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर पाच दिवसांनी त्याचं शीर कापलेलं धड सापडलं. तर दुसऱ्या दिवशी धडापासून कापलेलं शीर हे ५० मीटर दूर अंतरावर सापडलं.

bihar crime news
Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; सलील देशमुख यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

मृत तरुणाच्या भावाचा गंभीर आरोप

गोलूचा मोठा भाऊ संजीत कुमार सिंह यांनी सांगितलं की, गावातील एका विवाहित महिलेशी त्याच्या भावाचे प्रेमसंबंध होते. त्या महिलेचा पती संजीत शर्मा याने त्याची पत्नी निर्मला देवी आणि चार लोकांच्या मदतीने मिळून हत्या केली,असा आरोप मृताच्या भावाने केला.

bihar crime news
Mumbai Mantralaya News : मोठी बातमी! मंत्रालयात तरुणाचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

विवाहित महिलेने गोलूकडून लाखो रुपये घेतले होते. गोलूने दिलेल्या पैशांमधून महिला ऑनलाइन शॉपिंग करायची. कुटुंबाचा आरोप आहे की, गोलू चांगला कमाई करायचा. यामुळे महिलेने गोलूला जाळ्यात अडकवलं होतं. संजीत याने गोलूला फसवून गावापासून २ किलोमीटर दूर नेलं. त्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचं शीर हे धडावेगळं केलं.

bihar crime news
Fact Check : म्हशीनं पाजलं बिबट्यांना दूध? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

कुटुंबाचा आरोप आहे की, गोलू याच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं होतं. गोलूचे मार्च महिन्यात लग्न होणार होते. आई नीलम देवीने रडत रडत दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे. वडील बिजेंद्र सिंह यांनी म्हटलं की, म्हातारपणात दोषींनी आमचा आधार हिरावून घेतला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com