KALYAN BUDDHABHUMI DISPUTE: FOUNDATION ALLEGES MISLEADING CLAIMS, PROTEST ENTERS TENTH DAY Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Kalyan Budhabhumi Foundation : कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील वाद अधिक तीव्र झाला आहे. महाथेरो गौतम रत्न यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीस दिशाभूल करणारी ठरवत बौद्ध समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.

Alisha Khedekar

  • बुद्धभूमी फाउंडेशनने विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी

  • केडीएमसी मुख्यालयासमोर दहा दिवसांपासून धरणे आंदोलन

  • बुद्धमूर्तींची विटंबना आणि धम्मस्थळाची तोडफोड झाल्याचा आरोप

  • मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये अनेक महिन्यांपासून सुरु असलेला बुद्धभूमीच्या वादाबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे. कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेसंदर्भात विधानसभेत शिवसेना आमदार बालाजी किणीकर आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी असून ही बौद्ध समाजाची फसवणूक असल्याचा गंभीर आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाथेरो गौतम रत्न यांनी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

कल्याणच्या वालधुनी परिसरातील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान उभारण्यात येत असलेल्या चार पदरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामादरम्यान बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर अडथळा हटविण्याच्या कारवाईत महापालिकेकडून निष्काळजीपणा करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध बांधव आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होत असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करत आहेत.

आंदोलनादरम्यान बोलताना महाथेरो गौतम रत्न यांनी पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, ३० मे रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या आश्रयस्थान धम्म केंद्र परिसरातील बुद्धमूर्तींची विटंबना करण्यात आली. याशिवाय परिसरातील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. कोणत्याही धार्मिक विधीचे पालन न करता बुद्धमूर्ती हटवण्यात आल्या आणि त्यानंतर पवित्र धम्मस्थळातील विविध बौद्ध वास्तू तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, धार्मिक स्थळांचे झालेले नुकसान भरून काढावे आणि बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन न्याय द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशाराही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

SCROLL FOR NEXT