Family members and police inspect the safety tank in Jejuri where the missing toddler was tragically found. saam tv
मुंबई/पुणे

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

1.5 Year Old Child Drowned In Safety Tank Jejuri: जेजुरी येथे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा घराजवळील सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू. खेळता खेळता अचानक बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम राबवली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

घराबाहेर खेळता खेळता अचानक बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या चिमूकल्याचा घराजवळील सेफ्टी टॅंकमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील जेजूरी येथे घडली आहे. या ह्रदयद्रावक घटनेमुळे जेजूरी परिसरासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिव अविनाश हितापूर (वय 1.5 वर्ष) असे मृत पावलेल्या चिमूकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील दवणेमळा परिसरात हितापूर कुटुंब राहते. शनिवार (१८ जुलै) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास चिमुकला शिव घराच्या परिसरात खेळत होता. मात्र, काही वेळाने तो अचानक दिसेनासा झाला. मुलाला आजूबाजूला न पाहिल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला, मात्र शिवचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या घटनेची माहिती जेजुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, घराजवळच असलेल्या सेफ्टी टँकमधील पाण्यात अचानक बुडबुडे येत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले.

टँकमधील पाणी काढताच उडाला थरकाप

पाण्यात बुडबुडे दिसत असल्याने पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी तात्काळ टँकमधील पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली. टँकमधील पाणी उपसल्यानंतर चिमुकला शिव त्यामध्ये आढळून आला. त्याला टँकमधून बाहेर काढताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. शिवला तातडीने जेजुरी येथील खाजगी आयसीयू हॉस्पिटलमध्ये (ICU Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे हितापूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेजुरी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

Akola Fort : २ नद्यांच्या संगमावर उभा असलेला ऐतिहासिक किल्ला, आयुष्यात एकदा तरी पाहा सुंदर नजारा

बनावट 500 रुपयांच्या नोटांचे रॅकेट उघड; तिघांना अटक, 97 हजारांच्या 194 नोटा जप्त

SCROLL FOR NEXT