पुण्यात सोशल मीडियावर मैत्री अन् महिलेची फसवणूक; दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचं आमिष दाखवून दुचाकी, मोबाईल लंपास

Dagdusheth Ganpati Darshan Fraud In Pune: पुण्यात इन्स्टाग्रामवरून झालेली मैत्री तरुणीसाठी महागात पडली. दगडूशेठ गणपती दर्शन आणि पूजेचे आमिष दाखवून तरुणाने महिलेची दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
PUNE INSTAGRAM FRAUD
PUNE INSTAGRAM FRAUDsaam tv
Published On: 

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुण्यात सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणाने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला नेण्याचे आमिष दाखवून 33 वर्षीय महिलेला फसवले. पार्किंगच्या बहाण्याने महिलेची दुचाकी घेऊन आरोपी पसार झाला. या दुचाकीसह मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल त्याने लंपास केला आहे.

PUNE INSTAGRAM FRAUD
Navi Mumbai : नवी मुंबईत सशस्त्र दरोडा! व्हॅनमधून २० कोटींचं सोनं लुटलं; परिसरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बुधवार चौकाजवळ असलेल्या एका हॉटेल समोर घडला. संबंधित फिर्यादी आणि आरोपी यांची एक महिन्यापूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. माझी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मंदिरात ओळख आहे. गणपती बाप्पाचे दर्शन आणि पूजा करून देतो, असं सांगितलं. झालेल्या मैत्रीतून फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता त्या त्याला भेटायला गेल्या. यावेळी आरोपी फिर्यादी यांना भेटताच त्याने "तुमची गाडी पार्किंग मध्ये लावून येतो" असं सांगितलं.

PUNE INSTAGRAM FRAUD
Mumbai Local: मुंबईत चाललंय तरी काय? अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श, जाब विचारताच तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं

विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांची गाडी त्याच्या स्वाधीन केली आणि त्याची वाट बघत बुधवार चौकातील एका हॉटेल समोर उभ्या राहिल्या. संधी मिळाल्याने आरोपीने फिर्यादी यांची दुचाकी गायब केली आणि परतलाच नाही. बऱ्याच वेळ वाट बघितल्यानंतर आपली फसवणूक झाली आहे लक्षात येताच पोलिसात धाव घेतली.

PUNE INSTAGRAM FRAUD
डिलिमिटेशन बिलावर ठाकरेसेना काय निर्णय घेणार? खासदाराच्या व्यक्तव्याने संभ्रम वाढला

आरोपीने ९० हजार रुपये किंमतीची दुचाकी यासह त्यात ठेवलेला ४० हजार रुपये किंमतीचा फोन आणि ७ हजार रुपये रोख रक्कम अशी १ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाचा अपहार करत घेऊन गेला. संबंधित आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना वैयक्तिक माहिती, मौल्यवान वस्तू आणि वाहनांची जबाबदारी देताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.