नवी मुंबई, विकास मिरगणे
सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर दरोडा टाकल्याची घटना नवी मुंबईतील जुईनगर एमआयडीसी परिसरात घडली आहे. या दरोड्यात १६ किलोहून अधिक सोनं लुटल्याचा प्राथमिक अंदाज असून, या सोन्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगर एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवर रात्रीच्या वेळी सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला चार जणांच्या टोळीने लक्ष्य केलं. आरोपी वॅगनआर कारमधून आले होते. त्यांनी सोनं घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवलं.
त्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून व्हॅनमधील सोनं लुटल्याचा आरोप आहे. दरोडा टाकल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणात सोनं लुटण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, १६ किलोपेक्षा अधिक सोनं आरोपींनी लंपास केलं असावं.
या सोन्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे २० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मात्र, लुटलेल्या सोन्याचं नेमकं वजन आणि किंमत तपासानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या धाडसी दरोड्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.