Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मुंबईत मान्सूनचे आगमन, पावसाळी अधिवेशन अपडेट, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

एका ट्रॅव्हल्स बस मधुन प्रतिबंधीत गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खबर प्राप्त झाल्यानंतर तपास पथकाने नवले ब्रिज खाली ट्रॅव्हल्स बस पकडली

बस थांबवुन तपासणी केली असता चालक हबास मुबारक खान वय ३४ वर्षे रा. जिल्हा बाडमेर,राज्य राजस्थान याचे ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रतिबंधीत विमल पान मसला,व्हि १ तंबाखु, आर एम डी पानमसाला,तुळसी तंबाखु, गोवा गुटखा असा एकुण ५ लाख ९० हजार ८०० रुपयेचा मुद्देमाल व माल घेणारा आरोपी सोहेल अस्लम मुलाणी वय २२ वर्षे रा.६६७, गंजपेठ पुणे यास ताब्यात घेतले.

धाराशिवमध्ये विकास निधीवरून श्रेयवाद पेटला

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची श्रेय वादाची लढाई

वाशीमच्या रिसोड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

पहिल्याच पावसात नेतसा ते मागूळ झनक मार्गावरील पुलावर पूर.

काही काळ वाहतूक विस्कळीत.

पुलाच्या दोन्ही बाजूंना नागरिक व शेतकरी अडकले.

‘टीईटीच्या परीक्षेला महिला परीक्षार्थींना दुपट्टा,बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या रविवारीहोत आहे. यात महिला परीक्षार्थींना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.परंतु परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये परीक्षार्थींचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक असणार आहे.

सुरांच्या राणी'चा सन्मान! अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धर्मांतरण करणाऱ्यांना तातडीने आळा घालावा , हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिस ठाण्यात आंदोलन.

नाशिकच्या नांदगाव शहरात एका तरुणाला धर्मांतरासाठी प्रलोभन देऊन नकार दिल्यानंतर धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या धर्मांतर घटनेनंतर श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज नांदगाव च्या वतीने पोलिस ठाण्याच्या आवारात आंदोलन करण्यात आले.. यावेळी जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या..ख्रिश्चन मिशनरीकडून हिंदू बांधवांचे प्रलोभन, दिशाभूल व धार्मिक श्रद्धांवर आघात करून धर्मांतर केल्याबाबत चौकशी करावी, धर्मांतर करणाऱ्यांना तातडीने आळा घालावा व असे गैरकृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नांदगाव सह हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली..यावेळी पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांना निवेदन देण्यात आले..

परळीच्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

परळी तालुक्यातील चांदापूर येथील तलावामध्ये आज, २३ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी नावाचा व्यक्ती पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी नगरपरिषदेच्या शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, संबंधित व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी बुडाली तो स्पॉट याचा अचूक अंदाज येत नसल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून शोध लागण्यास उशीर होत आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात, धावत्या ट्रकला फॉर्च्युनर गाडीने दिली धडक

समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ आज सकाळी अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.. जखमींवर जालना येथे उपचार सुरू आहेत.. डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगर चे दिशेने जात होते.. मात्र समोर धावणाऱ्या ट्रकला त्यांच्या चार चाकी वाहनाने धडक दिली आणि या धडकेत डॉक्टर सय्यद आसिफ सह पत्नी गुलसितान बी हे दोघे पती- पत्नी जागीच झाले असून त्यांच्या गाडीचा चालक आणि दोन जण जखमी झाले आहेत.. या जखमी वरती सध्या जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .. ही कुटुंब नागपूरवरून संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होते मात्र ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला..

समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ आज सकाळी अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.. जखमेवरती जालना येथे उपचार सुरू आहेत.. डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगर चे दिशेने जात होते.. मात्र समोर धावणाऱ्या ट्रकला त्यांच्या चार चाकी वाहनाने धडक दिली आणि या धडकेत डॉक्टर सय्यद आसिफ सह पत्नी गुलसितान बी हे दोघे पती- पत्नी जागीच झाले असून त्यांच्या गाडीचा चालक आणि दोन जण जखमी झाले आहेत.. या जखमी वरती सध्या जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .. ही कुटुंब नागपूरवरून संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होते मात्र ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला..रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

रायगडमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस ढगाळ वातावरणासह उन पावसाचा खेळ सुरु होता. काल दक्षिण रायगडमध्ये तर आज संपूर्ण रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आसूड मोर्चा काढण्यात आला. नांदेड शहरातील नवीन मोंढा भागातून निघालेला हा आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.मोर्चात ट्रॅक्टर आणि बैलगाड्या घेऊन शेतकरी,काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Mumbai: गोकुळ गीते हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे -

गोकुळ गीते हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य

गोकुळ गीते कायद्याने थेट प्रवेश करू शकत नाहीतMum

 Mumbai: एनडीएची ताकद आणखी वाढली - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे -

शिवसेना आणखी बळकट आणि मजबूत होईल

एनडीएची ताकद आणखी वाढली आहे

सर्वसामान्य जनतेच्या मनातील शिवसेना

१२ लाख कोटींचा निधी केंद्राकडून मिळाला

मतदारसंघात निधी देण्यास सुरूवात झाली

सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे

Mumbai: मतदारसंघाचा विकास हा ६  खासदारांचा अजेंडा - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे -

मतदारसंघाचा विकास हा खासदारांचा अजेंडा

खादारांना निधीबाबतचे प्रस्ताव आणण्यास सांगितले

आमच्याकडे मोठी टीम तयार झाली

आमची आता १३ खासदारांची टीम तयार झाली

Mumbai: खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश आहेत - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे -

सर्व ६ खासदार खूश आहेत

खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी

बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेत ६ खासदार आलेत

कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही

Washim: वाशिमच्या मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात अनेक भागात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे संत्रा बागाना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मृग बहारासाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

पावसाअभावी संत्रा बागांमधील व्यवस्थापनाचा खर्च वाढत असून, यंदा वेळेत आणि चांगला पाऊस होऊन मृग बहार घेता यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

तर सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आज पडलेल्या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.

Pune: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत

पुणे -

पुण्यात कोयत्याची दहशत

हडपसर येथील साडेसतरा नळी सर्वे नंबर 203 व साईबाबा मंदिर या ठिकाणी घडली घटना

तरुणाचा दुचाकीवर हातात कोयता आणि बंदूक घेऊन रात्रीच्या वेळी दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल

कोयता दहशत थांबता थांबेना

Dhule: सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी आता सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे,

मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा परिणामांना पोलिस प्रशासन जबाबदार - लक्ष्मण हाके

टाकळी (ता. केज) येथील विलास घुले हत्या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी केवळ तीन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो नागरिकांचे ठिय्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके केजकडे रवाना झाले आहेत.

"मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा. अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील. बीडमध्ये नेमके चाललेय तरी काय? पोलिस कोणाच्या दबावाखाली आहेत का?" असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांचा रोष वाढत असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये भीषण अपघात

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बोईसर पूर्वेतील टाटा हाऊसिंगसमोरील रूप रजत परिसरात दुपारच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

बीडच्या केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलन, रुग्णवाहिकेची तोडफोड 

केज मध्ये रास्ता रोको आंदोलना दरम्यान अज्ञाताकडुन रुग्णवाहिकेची तोडफोड

विलास घुले खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांकडून तीन तासापासून महामार्ग रोखण्यात आला आहे.

वर्ध्यात टीईटी अटीविरोधात शिक्षकांचे दंडवत आंदोलन; राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची मागणी 

टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) अटीविरोधात वर्धा जिल्ह्यात शिक्षकांनी अनोखे दंडवत आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता टीईटी पात्रतेची अट लावण्यात येत असून, त्यामुळे २० ते २५ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सांगलीत पाऊसासाठी दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचे साकडं

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होवो,पाऊस पडो,असे साकडे सांगलीच्या जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील दानम्मा देवीला घालण्यात आले आहे. तुकाराम बाबा महाराज यांनी लोटांगण घालत दानम्मा देवी मंदिराला प्रदक्षिणा घलात, वरुण राजा प्रसन्न व्हो,असे साकडे घातले आहे.

नंदुरबारमध्ये पहिल्याच पावसात महामंडळाची दाणादाण 

पहिल्याच पावसात महामंडळाची दाणादाण...

नवापूर नाशिक बसमध्ये छतातून कोसळले पाणी...

गळत्या बस मधून 30 ते 35 प्रवाशांचा प्रवास...

खिडक्यांच्या फुटलेल्या काचांमधून वाऱ्यासह पावसाचे पाणी बस मध्ये आल्याने प्रवाशांची हाल...

पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीचे दावे फोल रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसची बिकट अवस्था

चंद्रकांत पाटील असते तर निवडणूक बिनविरोध - खासदार धैर्यशील मोहिते पाटील 

चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री असते तर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असती

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पालकमंत्री गोरेंवर निशाणा

शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनचे आगमन 

पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र अद्याप पेरणीसाठी आवश्यक असा दमदार पाऊस झालेला नाही.

90 फूट रोडवर ट्रान्सफॉर्मर खांबासह कोसळला, दोन दुचाकीस्वार जखमी 

डोंबिवली पूर्वेतील 90 फूट रोड परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर खांबासह अचानक रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत रस्त्यावरून जात असलेले दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

संगमनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

संगमनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी...

उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा...

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ...

मान्सूनच्या पावसाने बळीराजाला दिलासा...

खरीपच्या पेरणीला येणार वेग..

Pune : शिरोली बुद्रूक परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; खरीपपूर्व तयारीवर पाणी, शेतीचे मोठे नुकसान

शिरोली बुद्रूक परिसरात अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा घुसला.

खरीप हंगामासाठी मशागत करून तयार ठेवलेली सुपीक माती आणि शेतजमीन पाण्याबरोबर वाहून गेली.

अनेक ठिकाणी बांध फुटले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे

Palghar Rain : पालघरमध्ये पावसाची हजेरी

पालघर मध्ये पावसाची हजेरी . चिंचणी , कासा, मनोर , तलासरी भागात पावसाची हजेरी . मागील 20 ते 25 मिनिटांपासून पावसाची संततधार . मागील अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालघरकरांना दिलासा . उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा .

धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली कार्यकारिणी

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर २४ तासात जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त

Jalna : जालना जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

जालना जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार,जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी काढले आदेश

उन्हाची तीव्रता आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Beed : भाजीपाला बाजारात वृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्याने मारहाण‌

नेकनूर येथील भाजीपाला बाजारात वृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्याने आणि विटाने मारहाण‌

नेकनूर पोलिसात आरोपी राजेश पवार विरुद्ध गुन्हा दाखल.

विजेचा तडाखा; आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील २५० वर्षे जुने चिंचेचे झाड खाक

देवस्थानाच्या वैभवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या झाडाच्या नुकसानीमुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असुन पहाटेच्या सुमारास झाडावर वीज कोसळताच आग लागली आणि काही तास झाड धगधगत राहिले.यावेळी टँकरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत ऐतिहासिक चिंचेचे झाड जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pandharpur :   गरजू मुलींना मोफत सायकल वाटप

पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आर के चव्हाण यांनी गरजू व गरीब मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी मोफत सायकल‌ वापट केले. कासेगाव येथील विद्यालयात शिकणाऱ्या मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.

Pune Rain : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच पुणे , रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

जॉर्ज कुरियन हे केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जॉर्ज यांनी राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याने जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं राष्ट्रपती भवनाने म्हटलंय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हिंगोलीमध्ये दाखल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हिंगोलीमध्ये दाखल

थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील

रत्नागिरी- सकाळपासून पुन्हा एकदा कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू

अरबी समुद्र किनारपट्टी भागात मॉन्सून पुन्हा सक्रिय

गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमटर इतका पाऊस

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 91 मिलिमीटर पाऊस

त्या खालोखाल गुहागर तालुक्यात 76 मिलिमीटर पाऊस

अरबी समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे

आज आणि उद्या दोन दिवस समुद्र देखील खवळलेला राहणार

आता जनताच सगळं हातामध्ये घेणार-काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर.. ठाकरे गटाच्या आमदार फुटीवर यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य...

उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फोडून शिंदे सेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला..पैसा आणि सत्ता.. सत्ता आणि पैसा हा गोंधळ यांचा सुरू आहे.. पण हे जास्त दिवस टिकणार नाही लोकांना अजिबात आवडत नाही आहे.ही जी प्रवृत्ती चालली आहे. मत चोरायचे आणि लोक चोरायचे ,14 -15 वर्षे झाली तरी पण तुम्हाला दुसऱ्यांचे लोक चोरावे लागते त्यामुळे नक्की चांगले दिवस येतील..जनताच सगळं हातामध्ये घेणार आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली

पुण्याच्या भोर तालुक्यातील १७ हजार १७३ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे १०१ कोटी रुपयांची कर्जमाफी होणारं

भोर तालुक्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे

सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत किमान दोन वर्षे नियमित असणाऱ्या पात्र १० हजार ८४३ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची ४५ कोटी ३३ लाख एवढी रक्कमही मिळाली आहे, अशी माहिती देखील जगताप यांनी दिली

तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा प्रशासनाकडून आवाहन

आष्टीकर बापलेक म्हणाले, ऑपरेशन तुडवाला जशास तसे उत्तर देऊ

ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर काल मुंबईवरून नांदेड विमानतळावर दाखल झाले त्यानंतर हिंगोली लोकसभेतील हादगाव कडे गाड्यांचा ताफा घेऊन निघत असताना आष्टीकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत गद्दार लिहिलेले फलक झळकावले त्यानंतर आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी देखील ऑपरेशन तुडवा राबवत असाल तर जशास तसे उत्तर देऊ म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रति आव्हान दिले आहे, कुणी आपल्या अंगावर येत असेल तर आम्ही सोडणार नाही असं खासदार अष्टीकर हिंगोलीत दाखल झाल्यानंतर म्हणाले आहेत पाहूयात खासदार नागेश पाटील आष्टीकर व त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवाला कसे उत्तर दिले.

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने पुनरागमन केले असून गेले पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ, माणगावसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात लागवड आणि शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आजच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जून संपत आला तरी उन्हाचा पारा कमी होईना

एल निनोच्या प्रभावाचा मोठा फटका, लातूरमध्ये बसताना पाहायला मिळतोय, जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात पावसाचा थेंब नाही. उन्हाचा पारा 36ते 37 अंश सेल्सिअस वर नोंदतो आहे. दरम्यान उन्हाचा पारा लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत , लातूर जिल्ह्यातील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलाय, सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, दरम्यान 15 जून पासून सर्व शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत, मात्र उन्हाचा पारा लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमांसह खाजगी, अनुदानित संस्था, जिल्हा परिषद यासह इतर सर्व शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला.

खारघरमध्ये पाणीटंचाईवरून रहिवाशांचा संताप; बिल्डरला महिलांचा घेराव

नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी रहिवासी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra News Live Update: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरून महायुतीत राजकारण तापलं

सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला असला तरी फुटलेल्या 100 मतांवरून आता राजकारण तापू लागलेल आहे. या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता थेट निशाणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर धरला आहे. कराड येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबात आम्ही पक्के आहोत. अनेक लोकांच्या अोठात एक, मनात एक आणि करणीत आणखी वेगळं होत. परंतु, ते कोणालाही शक्य झाल नाही. तर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुती सोबत राहिले का हे देवाला माहिती, असे म्हणत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com