Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar News Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा; गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

वृत्तसंस्था

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Gopichand Padalkar Latest News: एमपीएससीची पोस्ट नाही निघाली तर पंचायत समितीची निवडणूक लढवा असा अजब सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी MPSCच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. पुण्यात आज, गुरुवारी ते स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा अजब सल्ला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. (Pune Latest News)

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, एमपीएससी निघाली नाही तर निराश होऊ नका, गावाकडे जाऊन निवडणूक लढवा. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे. जवळपास २०-२१ तास मुलं अभ्यास करतात. तर, तुम्ही नैराश्यात जाऊ नका, निराश होऊ नका. इथं तुम्हाला संधी नाही मिळाली तरी गावाकडं अनेक संध्या आहेत. त्या संध्यांचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. एमपीएससीचा पोरगा गावचा सरपंच झाला तर बिघडलं कुठं? एमपीएससीचा पोरगा गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. पडळकरांच्या या अजब सल्ल्याची सध्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (MPSC Students) चांगलीच चर्चा होतेय.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, मी वयाच्या २२ व्या वर्षापासून कार्यकर्ता म्हणून फिरतो आहे. विद्या ताई यांनी माहिती घ्यायला हवी. एमपीएससीबाबत आज चर्चा झाली. ५ आमदार आज या संवादामध्ये सामील होते. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे म्हणून तुम्ही नैराश्यात जाऊ नका. एमपीएससीचा विद्यार्थी गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? असं पडळकर म्हणाले. तसेच सोमवारी एमपीएससीबाबत एक बैठक घेणार आहोत. एमपीएससी सदस्य निवडीसाठी ओपन, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती यांना प्राधान्य द्यावं अशी आमची मागणी आहे असंही पडळकर म्हणाले. (Latest Marathi News)

शरद पवारांवर हल्लाबोल

यावेळी पडळकरांनी शरद पवारांवरही हल्लाबोल केला आहे. जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ते करतायत, हे काय नव्याने लोकांच्या समोर येत नाही. हा अनेक वर्षांपासून विषय आहे. जातीपातीचा लोकांच्या मतासाठी वापर करायचा, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचे त्यानं तोंडी लावायला काहीतरी द्यायचं. मनमानी आणि नात्यागोत्याचा राजकारण करायचं आणि प्रस्थापित लोकांना मोठं करायचं हे त्यांनी केलं आहे असा हल्लाबोल त्यांनी पवारांवर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

SCROLL FOR NEXT