
संजय गडदे, मुंबई
Korean Vlogger Harassed In Mumbai: मुंबईत एका कोरियन तरुणीचा दोन टवाळखोरांकडून विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. याप्रकरणी आता दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
परिमंडळ-०९ पोलीस उप-आयुक्त अनिल पारसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाणे हद्दीत एका कोरियन महिलेसोबत घडलेल्या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या दोन्ही आरोपींविरोधात सुमोटो तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ही संतापजनक घटना उघडकीस आली. मुंबईत (Mumbai) काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली. बुधवारी रात्री ही संतापजनक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच, मुंबईकरांनी संताप व्यक्त केला.
पीडित तरुणी ही युट्यूबर असून ती दक्षिण कोरियाची नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका तरुणाने मुंबई पोलिसांना टँग करून हा व्हिडीओ ट्विट केला होता. व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी (Mumbai Police) ) या घटनेची गंभीर दखल घेतली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून (Viral Video) पोलिस छेड काढणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. पीडित महिला दक्षिण कोरियाची नागरिक आहे आणि रात्री 8 वाजता ही घटना घडली तेव्हा उपनगरीय खार भागात 'लाइव्हस्ट्रीमिंग' करत होती. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण या तरुणीच्या अगदी जवळ आला.
या तरुणाने तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यातल्या एकाने तरुणीचे जबरदस्ती चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. या संतापजनक प्रकारानंतर ही तरुणी घटनास्थळावरून निघून जाऊ लागली, तोच हा तरुण पुन्हा या तरुणीच्या पाठीमागे स्कुटीवर येताना दिसला. तुला तुझ्या घरी सोडतो, असं म्हणत या तरुणाने कोरियन तरुणीला जबरदस्तीने स्कुटीवर बसवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या तरुणीने इंग्रजीत त्याची ऑफर स्पष्ट नाकारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सुमोटो याचिका दाखर केली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्हा कबूल केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.