Maharashtra Cabinet Expansion: अखेर मुहूर्त सापडला! 'या' दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

Maharashtra Cabinet Expansion News: आज, गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
shinde-Fadnavis Cabinet Expansion
shinde-Fadnavis Cabinet Expansionsaam tv

सुशांत सावंत,मुंबई

Maharashtra Cabinet Expansion News: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज, गुरुवारी तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या १३ डिसेंबर २०२२ ला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. (Maharashtra Cabinet Expansion Latest News)

shinde-Fadnavis Cabinet Expansion
'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत'

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि महामंडळ वाटपासाठी सत्ताधारी आमदारांकडून दबाव आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

आज, गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदं वाटपाचा फॉर्म्युला आणि संभाव्य नावांच्या यादीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता डिसेंबरमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

shinde-Fadnavis Cabinet Expansion
Mahaparinirvan Din 2022: भीम अनुयायांसाठी महत्वाची बातमी; बाबासाहेबांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियमावली जाहीर

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ आमदारांनी घेतली होती मंत्रिपदाची शपथ

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ हे ९ ऑगस्ट २०२२ ला स्थापन झाले. यात राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com