Mahaparinirvan Din 2022: भीम अनुयायांसाठी महत्वाची बातमी; बाबासाहेबांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नियमावली जाहीर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 Guidelines : यंदा दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलिसांनी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar SmarakSaam TV
Published On

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 Guidelines : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din 2022) दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. गेल्या २ वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधनं होती, मात्र आता कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दादरमधील चैत्यभूमीवर (Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak) भीम अनुयायांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलिसांनी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मुंबई पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, दिनांक ०५/१२/२०२२ ला संध्याकाळी ६ वाजेपासून ते दिनांक ०७/१२/२०२२ ला रात्री १२ वाजेपर्यंत दादर येथील चैत्यभूमी, शिवाजीपार्क परिसराकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी काही मार्गाच्या निर्देशनामध्ये बदल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Mahaparinirvan Din Guidelines
Mahaparinirvan Din GuidelinesSaam TV

एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते खालीलप्रमाणे

१) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीकरीता बंद राहील. तथापी हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील.

२) एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहिल म्हणजेच सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोतृगिज चर्च जंक्शन येथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल.

३) संपूर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद राहील.

४) ज्ञानेश्वर मंदिर रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहील.

५)जांभेकर महाराज रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहील.

६) संपुर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हा वाहतुकीकरीता बंद राहील.

७) संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरीता बंद राहील.

८) कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद राहील.

९) सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुक करणारी वाहने यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या माहिम जंक्शन ते हर्डीकर जंक्शनपर्यंत, एल. जे. रोडच्या माहिम जंक्शन ते गडकरी जंक्शन पर्यंत, गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाकापर्यंत, सेनापती बापट मार्गाच्या माहिम रेल्वे स्थानक ते वडाचा नाकापर्यंत आणि टिळक ब्रिज ते संपुर्ण एन. सी. केळकर रोडपर्यंत वाहतुकीकरीता बंद राहतील. (LIVE Marathi News)

Mahaparinirvan Din Guidelines
Mahaparinirvan Din GuidelinesSaam TV

वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाबाबत मार्गक्रमणाच्या सूचना

१) दक्षिण वाहीनी पश्चिम द्रुतगती मार्गे माहिम एल जे रोड अथवा सेनापती बापट मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी - कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते साथन रेल्वे स्थानक किंवा ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे साथन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात अथवा बांदा-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे ( सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.

२) उत्तर वाहीनी कुलाबा कडून बि.ए. रोडने अथवा हाजी अली मार्गे ॲनी बेझेंट रोडने उत्तर वाहीनीवरून जाणाऱ्या वाहनांनी - पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे साथन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे अथवा बांदा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.

३) महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी - डॉ. ई. मोजेस रोड, रखांग चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.

४) पूर्व द्वतगती महामार्गे दक्षिणेकडे जाणारी वाहतुक - या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पूर्व मुक्त द्वतगती मार्गाचा वापर करावा. (Tajya Batmya)

Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Korean Vlogger Harassed: कोरियन तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Mahaparinirvan Din Guidelines
Mahaparinirvan Din GuidelinesSaam TV

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या शिवाजीपार्क परिसरातील खालील रस्ते "नो पार्किंग" झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

१) संपुर्ण स्वातंत्रवीर सावरकर मार्ग.

२) संपूर्ण ज्ञानेश्वर मंदिर रोड.

३) संपूर्ण जांभेकर महाराज रोड.

४) संपूर्ण रानडे रोड.

५) संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि उत्तर.

६) संपूर्ण एम. बी. राऊत रोड.

७) संपूर्ण पांडूरंग नाईक मार्ग.

८) संपूर्ण एन. सी. केळकर रोड.

९) डॉ. वसंतराव जे. राथ मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते अमेगो हॉटेलपर्यंत.

१०) एस. एच. पळरकर मार्ग हा स्वातंत्रवीर सावरकर मार्ग ते मिलरनीथम बिल्डींगपर्यत.

११) डी. एस. बाबरेकर मार्ग हा सुर्यवंशी हॉल जंक्शन ते व्हिजन क्रेस्ट बिल्डींगपर्यंत.

१२) किर्ती कॉलेज लेन मार्ग हा किर्ती कॉलेज सिग्नल ते मीरामार सोसायटीपर्यंत.

१३) काशीनाथ धुरु रोड हा काशीनाथ धुरु जंक्शन ते आगार बाजार सर्कलपर्यंत.

१४) एल. जे. रोड हा शोभा हॉटेल ते गडकरी जंक्शनपर्यत.

१५) कटारीया मार्ग हा गंगाविहार जंक्शन, शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत.

१६) राजगृह परिसराच्या बाजूचा हिंदू कॉलनी रोड नं. ०१ ते रोड नं. ०५ पर्यंत.

१७ लखमसिंग नप्पू रोड हा हिंदू कॉलनी रोड नं. ०५ ते रुईया कॉलेज, दडकर मैदानपर्यंत

१८) स्वारेघाट रोड नं. ०५ ते पाटकर गुरुजी चौकपर्यंत.

१९ लेडी जहांगिर रोड हा रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेंन्ट जोसेफ स्कूल पर्यंत.

२०) आर. ए. किडवाई रोड हा अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शनपर्यंत

२१) नाथालाल पारेख मार्ग हा सेन्ट जोसेफ स्कूल ते खालसा कॉलेजपर्यंत. (Maharashtra News)

Mahaparinirvan Din Guidelines
Mahaparinirvan Din GuidelinesSaam TV
वाहने पार्क करण्यास उपलब्ध असलेले रस्ते

१) संपुर्ण सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई ४०० ०१३.

२) कामगार मैदान, सेनापती मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई ४०० ०१३.

३) इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन (प.), मुंबई. ४०००१३.

४) इंडिया बुल्स ०१ सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन (प.), मुंबई. ४०० ०१३.

५) कोहिनुर स्केअर, कोहिनुर मिल कंपाऊंड, दादर (प.), मुंबई, मुंबई ४०० ०१३.

६) लोढा, कमला मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३.

७) पाच गार्डन, लेडी जहांगीर रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई ४००१९.

८) एडनवाला रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई ४०० ०१९.

९) नाथालाल पारिख मार्ग, माटुंगा (पूर्व), मुंबई ४०००३१.

१०) आर. ए. के. ४ रोड, वडाळा (प.), मुंबई ४०० ३१. (Breaking Marathi News)

Mahaparinirvan Din Guidelines
Mahaparinirvan Din GuidelinesSaam TV
भोजन वाहन व्यवस्था

१) शिवाजीपार्क पोलीस ठाणे यांचेकडून देण्यात आलेले पास घेऊन येणारी वाहने ही राजा बडे चौकातून ट्राफिमा हॉटेल समोर, एम. बी. राऊत मार्ग येथे थांबतील.

२) भोजन व्यवस्था ही १) ट्राफिमा हॉटेल समोर, एम. बी. राऊत मार्ग २) पांडूरंग नाईक मार्ग, पिंगे चौक, सारस्वत बँक समोर, ३) एस. एच. परळकर मार्ग, सीता निवास, विष्णू निवास, लक्ष्मी निवास समोर, ४) एल. जे. रोड आणि पद्माबाई ठक्कर मार्गाच्या पदपथावर करण्यात आलेली आहे.

३) भोजन वाटप झाल्यानंतर वाहने ही एम. बी. राऊत मार्गावरुन दिलीप गुप्ते मार्गे एस बॅक सिग्नल किंवा राजाबडे, चौकाकडे बाहेर पडतील.

टीप: अत्यावश्यक वाहनांना माहिमकडे जाण्यासाठी सिध्दीविनायक जंक्शन ते हिंदूजा हॉस्पीटल पर्यंत दक्षिण वाहीनीवर रास्खीव मार्गिका ठेवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com