IAS Tukaram Mundhe Saam TV
मुंबई/पुणे

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

IAS Tukaram Mundhe Transfer: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २१ वर्षांत त्यांची २५ वेळा बदली करण्यात आली आहे. मंत्रालयातीलच एका महत्वाच्या विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Priya More

Summary -

  • आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

  • महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

  • २१ वर्षांत २५ वेळा बदली झालेला अधिकारी

  • कडक कारवाई आणि शिस्तप्रियतेमुळे कायम चर्चेत

सचिन जाधव, पुणे

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या. १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नेहमी चर्चेत राहणाऱ्या तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून थेट आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागात ते सचिव होते. आता त्यांची बदली मंत्रालयातील महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तुकाराम मुंढे यांच्यावर महसूल आणि वन विभाग या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेले आयएएस अधिकारी आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यांनी अनेक कामचुकार आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता दिव्यांग कल्याण विभागात काम करताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रकांवर त्यांनी कारवाई केली होती. त्यात त्यांनी जिल्हा परिषदांमधील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया आणि पडताळणी मोहिम देखील सुरू केली होती. ही मोहिम सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली आहे.

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आत्तापर्यंत कुठे-कुठे बदल्या झाल्या -

ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग.

जुलै २००९ - सीईओ, वाशिम.

जून २०१० - सीईओ, कल्याण.

जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना.

सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी.

मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका.

नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन.

डिसेंबर २०१८ - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका.

ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

सप्टेंबर २०२२ - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

२९ नोव्हेंबर २०२२ - नियुक्तीच्या प्रतीक्षेत

एप्रिल २०२३ - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

२ जून २०२३ - सचिव मराठी भाषा विभाग

२१ जुलै २०२३ - कृषी विभागाच्या दुग्धविकास व पशसंवर्धन विभाग सचिव

१८ जुन २०२४ विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुबई

५ जुलै २०२५ सेक्रेटरी दिव्यांग कार्यालय डिपार्टमेंट मंत्रालय

३१ मार्च २०२६ दिव्यांग सेक्रेटरी कार्यालय मंत्रालय ते सेक्रेटरी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग मुंबई मंत्रालय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या परळीत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर ACBची मोठी कारवाई

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

भोंदू खरातच्या नाशिकच्या बंगल्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी फरार, मुलगा पोलिसांच्या ताब्यात

Wednesday Horoscope: जुनी कामं पूर्ण होतील, ५ राशींच्या हातात पैसा टिकेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT