भोंदू खरात IPS, IAS अधिकाऱ्यांना बायकांची अदलाबदल करायला लावायचा; माजी मंत्र्यांच्या आरोपांनी खळबळ | Special Report

wife swap allegation in ashok kharat case : भोंदू अशोक खरातचे एकेक कारनामे उघड होत असताना, माजी मंत्र्यांनी केलेल्या नव्या आरोपानं खळबळ उडाली आहे. खरात हा बदली, बढतीसाठी IPS आणि IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या बायकांची अदलाबदल करायला लावायचा, असा दावा करण्यात आला आहे.
खरातचा कारनामा; IPS, IAS अधिकारी करायचे बायकांची अदलाबदल
Ashok Kharat case updatesaam tv
Published On
Summary
  • 'खरातच्या दलालीनं अधिकाऱ्यांचं वाईफस्वॅपिंग'

  • 'वाईफ-स्वॅपिंगमध्ये IAS, IPS अधिकाऱ्यांचाही समावेश'

  • वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ

तंत्र मंत्राच्या नावाने बदली, बढतीसाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना दलाल खरात चक्कं बायकांची आदलाबदल करायला लावायचा, असा आरोप करण्यात आलाय. मात्र हा आरोप कुणी केलाय? आणि त्यावर सरकारने काय उत्तर दिलंय. जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून.

पाखंडी खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. आधी खरातचं अधिकारी कनेक्शन समोर आल्यानंतर तंत्र मंत्राच्या आणि काळ्या जादूच्या नावाखाली दलाल खरात थेट अधिकाऱ्यांच्या बायकांची अदलाबदली करायचा असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. विशेष म्हणजे आयएएस आणि आयपीएसच्या अधिकाऱ्यांचाच यात सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तर वडेट्टीवारांनी पुरावे असतील तर द्यावेत, असं आव्हान महसूलमंत्री बावनकुळेंनी दिलंय.

खरंतर भोंदू खरात महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांना वासनेची शिकार बनवत असल्याचं समोर आलं. एवढंच नव्हे तर याच भोंदू खरातकडे अनेक शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांचा राबता असल्याचं समोर आलंय. अनेक अधिकाऱ्यांनी खरातचं हजारो कोटींचं साम्राज्य उभं करायला मदत केल्याचाही दावा केला जातोय.

विशेष म्हणजे खरात शासकीय अधिकाऱ्यांना ऑफिसच्या बाहेर बसवायचा आणि त्यांच्या पत्नीसोबत आत धक्कादायक कृत्ये करत असल्याचे आरोपही करण्यात आले. त्यामुळे बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता पोलीस तपासासोबतच वडेट्टीवारांनीही त्यांच्याकडे असलेले पुरावे एसआयटीकडे द्यायला हवेत. याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीचा वस्तूसारखा वापर केला आणि तिला खरातच्या वासनेच्या नरकात ढकलून दिलं, त्या अधिकाऱ्यांवरही जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी.

पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com