यंदा होळीचा सण हा २४ मार्चला साजरा केला जाईल तर २५ मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. होळी हा रंगांचा सण. या काळात रंगांची उधळण केली जाते.
निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर होळीचा (Holi Festival) रंग बेरंग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे राजकीय पक्ष आणि नागरिकांना आव्हान केले आहे.
राज्यात आचार संहिता सुरु असून विविध राजकीय पक्षांकडून या सणाचा वापर निवडणुकांसाठी होऊ शकतो. यासाठी पोलिसांनी खबरदरी घेण्याच्या सूचना जाहिर केल्या आहेत.
होळी-धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गाईडलाईन जारी
पोलिसांनी (Police) सांगितले की, सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्या जातील असे फोटो, व्हिडीओ, समाजसुधारक आणि थोर व्यक्तींबद्दल आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
धुलिवंदनाच्या दिवशी अनेकजण भांग पितात. अशावेळी दुधात भेसळ होऊन विषबाधा होऊ शकते. त्याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
पोलिस ठाण्याजवळ पेट्रोल, अॅसीड, स्फोटक पदार्थ, तलवारी, चॉपर, सुरे, अग्निशस्त्रे इत्यांदीचा साठा ठेवणाऱ्यावर अनधिकृतपणे कारवाई करण्यात येईल.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक करावाई करण्यात येईल.
तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अफवा पसरवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सध्या वेशात पोलीस तैनात ठेवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मुलतत्वावादी (fundamentalist) किंवा जातीयवादी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालीवर तसेच कार्यालये, शाखा आणि चौकात लावलेल्या सुचना फलकावर जबाबदारीने लक्ष ठेवण्याच्या सूचना
राष्ट्रीय नेत्यांच्या पुतळ्यांकडे धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांकडे पहाटेच्या वेळी विशेष लक्ष देण्यात यावे. विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी लोकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गैरवर्तन करणारे, चुकीचे हावभाव करुन नाचणे, रंग लावणे, रस्त्यावरील लोकांवर रंगांचे फुगे मारणे, मुलींची/स्त्रियांची छेड काढण्याऱ्या, शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
रंगांचे फुगणे, रंग फेकणे यावर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्या, काळया काचा लावलेली वाहने, डिकीमध्ये जास्त माल भरलेली वाहने यांची तपासणी करण्याच्या सूचना
नाकाबंदीसाठी ठेवलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदरांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष हजर राहून मार्गदर्शन करण्याच्या सूचना.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.