Holi 2024 : सावधान! होळीच्या रासायनिक रंगांचा त्वचेवर होतोय गंभीर परिणाम, कशी घ्याल काळजी

Holi 2024 Date : यंदा होळीचा सण हा २४ मार्चला साजरा केला जाणार आहे तर २५ मार्चला धूलिवंदन साजरा केले जाईल. या सणानिमित्त बाजारात अनेक रंग पाहायला मिळतील.
Holi 2024, Holi Colors Side Effects
Holi 2024, Holi Colors Side Effects Saam Tv

Holi Colors Side Effects :

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला दरवर्षी रंगपंचमी खेळण्याची उत्सुकता असते. लवकरच होळीचा सण येईल. यंदा होळीचा सण (Holi Festival) हा २४ मार्चला साजरा केला जाणार आहे तर २५ मार्चला धूलिवंदन साजरा केला जाईल. या सणानिमित्त बाजारात अनेक रंग पाहायला मिळतील.

अशातच रंगपंचमीसाठी बाजारात मिळणाऱ्या बनावटी रंगांमुळे वेगवेगळ्या आजारांना (Disease) ग्रिन सिग्नल मिळतो. या रसायन मिसळलेल्या रंगांमुळे शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या.

रंगपंचमी खेळण्यासाठी वापरले जाणारे रंग रसायन विरहित असणे गरजेचं आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या रंगांमध्ये ऑक्साइड, कॉपर सल्फेट, क्रोमियम आयोडाइड, मरकरी सल्फाइट यांसारखे रसायनिक घटक आढळतात ज्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.

Holi 2024, Holi Colors Side Effects
Holi 2024 : होळीच्या पूर्वी घराबाहेर फेका या गोष्टी, पैशांची चणचण होईल दूर

बनावटी रंग बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध मिळतील. होळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. रंगपंचमीच्या वेळी खेळतांना नैसर्गिक रंगांचा वापर केला पाहिजे असं तज्ज्ञ सल्ला देतात. आपल्या शरीरातील सर्वात संवदेनशील ही त्वचा (Skin) असते. त्यामुळे रंग खेळताना त्यांची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते.

यासाठी रंग खेळताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना त्वचेची काळजी घेण्यास सांगितले जाते. यादिवशी घराबाहेर पडताना त्वचेची काळजी कशी घ्यावी, डोळ्यांना त्रास होणार नाही याविषयी सांगितले जाते.

Holi 2024, Holi Colors Side Effects
Holi 2024 Horoscope : होळीच्या पूर्वी या राशींना राहा सावध, नुकसान होण्याची शक्यता

या रसायनिक रंगांचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यासोबतच ज्या लोकांची त्वचा अतिसंवेदनशील असते त्यांना रंग खेळतांना खूप खबरदारी घ्यावी लागते. रंगातील रसायनाचा त्वचेशी थेट संपर्क झाल्यानंतर त्वचा लाल होते. त्यामुळे त्वचेवर लाल चट्टे, पुरळ यासारख्या त्वचेच्या विकारांना आमंत्रण मिळते.

डोळा शरीरातील अतिशय नाजूक भाग असतो. रंगांमधील रसायनांचा गंभीर परिणाम हा डोळ्यांवर होतो. रंगांमुळे डोळ्यांची जळजळ होते आणि त्यातून सतत पाणी येण्याची समस्या होते. त्याशिवाय अति रसायनामुळे कायमचे अंधत्व येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. रसायनिक रंगांमध्ये शिसं आणि क्रोमियम सारखे घटक आढळतात ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या रंगाचा वापर करणे टाळा.

रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळतात त्याच दरम्यान रंगाचे काही कण हवेत मिसळले जातात. या रसायनांच्या तीव्र प्रभावामुळे सर्दी, खोकला अस्थमा यासारखे श्वसनासंबंधीत गंभीर आजार होऊ शकतात. गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ती यांची रोगप्रतिकारकशक्ती नाजूक असल्यामुळे त्यांनी अशा रंगांपासून लांब रहावं.

Holi 2024, Holi Colors Side Effects
Holi 2024 Puja, Muhurt: होळी पूजनचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या तिथी आणि पूजा पद्धत

रासायनिक रंगांचा गंभार परिणाम हा पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होतो. हे रंग मातीत आणि पाण्यातच मिसळले जातात. वनस्पती आणि झांडांची वाढ होत नाही. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून जास्त प्रमाणात नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास तुम्हाला जीवित हानी होणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com