Vanraj Andekar Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar : गँगवॉर, राजकरण अन् वर्चस्वाची लढाई, पुण्यातील आंदेकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास; वाचा...

Vanraj Andekar Gangwar family history : रविवारी बंडू आंदेरकरचा मुलगा वनराज याचा नवी पेठमध्ये खून करण्यात आला. एकेकाळी नवीपेठमध्ये बंडू आंदेरकरचा दबदबा होता. नाना पेठ परिसरात दहशत निर्माण करणार्‍या आंदेकर टोळीचा इतिहास रक्तरंजितच राहिलाय.

Namdeo Kumbhar

History of the Andekar family from Gangwar, Politics to battle of supremacy in Pune: पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्या पैकी एक असलेली टोळी म्हणजे आंदेकर टोळी. नाना पेठ परिसरात दहशत निर्माण करणार्‍या आंदेकर टोळीचा इतिहास रक्तरंजितच राहिलाय. १९८० च्या दशकात या टोळीने पुण्यात धुमाकूळ घातला होता. या टोळीचा मोहरक्या बाळू आंदेकर होता. बाळूच्या निधनानंतर ही टोळी बंडू आंदेकर यानं पुढे चालवली.

रविवारी बंडू आंदेरकरचा मुलगा वनराज याचा नवी पेठमध्ये खून करण्यात आला. एकेकाळी नवीपेठमध्ये बंडू आंदेरकरचा दबदबा होता. त्याच नवीपेठमध्ये मुलगा वनराजला १४-१५ जणांच्या टोळक्याने संपवले. रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास पाच गाड्यावरुन १५ जण आले. त्यांनी आधी पाच राऊंड फायर गेल्या. त्यानंतर चाकू आणि कोयत्याने हल्ला करत संपवले. वनराज आंदेकर अजित पवार गटाचा माजी नगरसेवक राहिलाय, त्याचे वडील टोळीचा मोहरक्या होते. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे.

वनराज आंदेकर कोण आहेत?

2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत वनराज आंदेकर हे नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या काळात वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर यांनीही नगरसेवकपद भूषावलेय. राजश्री आंदेरकर या 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म नगरसेवक होत्या. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते. तर वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.

वडील जामीनावर बाहेर

आंदेकर टोळीचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. मोहरक्या बंडू आंदेकर यानं १९९० च्या दशकात पुण्यात दहशत निर्माण केली होती. बंडू आंदेकर आताच जामीनावर बाहेर आले आहेत. मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती.

आंबेकर टोळी आणि आंदेकर टोळी यांच्यामध्ये १९८० पासून संघर्ष आहे. आंबेकर टोळीमधील प्रमोद माळवदकर याच्या खूनप्रकरणी बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. बंडू आंदेकर याच्यावर खून, शस्त्रे बाळगणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

माळवदकरचा अंत, आंदेकरचं वर्चस्व

आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. पण अतंर्गत वादातून प्रमोद माळवदकर वेगळा झाला. १९ नोव्हेंबर १९९७ मध्ये पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रमोद मालवडकर याला संपवले. प्रमोद याचा अंत झाल्यानंतर आंदेकर गँगने आपलं वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली. १५ वर्षानंतर आंदेकर गँगला पुण्यात हातपाय पसरायला संधी मिळाली. बाळू आंदेकर याच्या निधनानंतर सूर्यकांत उर्फ बंडू यांनी गँगची जबाबदारी संभाळली. पुण्यातील गुन्हेगारीवर आंदेकर गँगने वर्चस्व मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT