Vanraj Andekar Pune update : पुण्यातील नवी पेठ, वेळ रात्री ८.३० वाजता. गजबलेल्या रस्त्यात वनराज सहकाऱ्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी ४ ते ५ गाड्यांवर १४ -१५ जण आले. क्षणार्धात वनराजवर हल्ला केला. बंदुकीतून चार-पाच राऊंड फायर करण्यात आले. वनराज यातून कसाबसा वाचला. पण टोळक्यांनी आपल्याजवळचे कोयते अन् चाकू बाहेर काढत वनराजकडे धाव घेतली. वनराजने पळण्याचा प्रयत्न केला, पण टोळक्यानं त्याच्यावर सपासप वार करत जखमी केलं. जखमी अवस्थेतील वनराजला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले, पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
वनराजच्या निधनानंतर पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नच्या थराराची चर्चा सुरु झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनीही वेगानं तपास केला. वनराजच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनंतर दोन्ही बहिणींना अटक केली. संपत्तीमुळेच वनराजला दोन्ही बहिणी आणि दाजींनी सुपारी दिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेय. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
वनराज यांची हत्या झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली. वनराज यांच्या दोन्ही बहिणींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वनराज यांच्या हत्येची सुपारी दोन्ही बहिणींनी दिल्याची माहिती पोलिसांना वडिलांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. वनराज यांचे दोन्ही दाजी या कृत्यामध्ये सामील आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वनराज यांची नवी पेठमध्ये हत्या झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली होती. पुण्यात पोलिसांवर पुन्हा एकदा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी प्रकरणाची तीव्रता पाहता तात्काळ कारवाई करत अनेकांना बेड्या ठोकल्या. यामध्ये दोन्ही सख्या बहिणींचाही समावेश आहे. संपत्तीसाठी वनराज यांना संपवल्याचे तपासात उघड झालेय. सख्या बहिणी आणि दाजींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कौटुंबिक वाद आणि संपत्तीया वादातून हा खून केल्याची माहिती उघड झाली आहे. वनराज यांचा खून करण्यासाठी त्यांच्याच बहिणींनी आणि दाजींनी प्लॅन बनवला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते. जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराज यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यानंतर गोळीबार करत आणि कोयत्याने हल्ला करत वनराजचा जीव घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.