पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ७५ टक्के भरले. या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुठा नदीत २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण ७५ टक्के भरले. त्यामुळे धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
खडकवासला धरण सध्या ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते ११ वाजेपर्यंत ४० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. फक्त धरण क्षेत्रात नाही तर पुणे शहरासह आसपासच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणात पाण्याची वाढती आवक पाहता खडकवासला धरणातून सावधगिरीचा उपाय म्हणून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यकतेनुसार पुढील काही तासांत धरणातून पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, पीएमआरडीए आणि महावितरण यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नदीपात्रात जनावरे, साहित्य इत्यादी असल्यास ते तातडीने हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने महापालिका, पोलिस, पीएमआरडीए, महावितरण यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.