Pune Dam Water Levels : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! खडकवासला ते टेमघर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

Water Levels in Pune Dams : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. सध्या एकूण २०.२७ टीएमसी (६९.५२%) पाणीसाठा असून, पवना ९४% भरले आहे.
Pune Dam Water Level
Khadakwasla Dam Chain Fills Up: Pune’s Water Storage Increases Significantly Due to Monsoon ShowersSaam TV News
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Current water storage in Khadakwasla, Panshet, and Temghar dams : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण २०.२७ टीएमसी (६९.५२ %) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी जास्त पाणी उपलब्ध आहे. पवना धरण ९४% भरले असून, उजनी धरणही १००% भरण्याच्या मार्गावर आहे. या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आजअखेर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण ५.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४.१३ टीएमसी होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत एक टीएमसी जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे, ही पुणेकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे.

Pune Dam Water Level
Maharashtra Weather : १३ जिल्ह्यांसाठी अलर्ट, वादळी पावसाचा अंदाज, वाचा आज कसं असेल हवामान

कोणत्या धरणात किती पाणीसाठी ?

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, एक जूनपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पानशेत धरणात १९ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या धरणात १.६२ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात १७ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. येथे २.७९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, टेमघर धरणात यंदा पावसाचा अभाव आहे. एक जूनपासून केवळ ४१ मिलिमीटर पाऊस पडला असून, या धरणात फक्त ०.१७ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

Pune Dam Water Level
पुण्यात कोयता गँगचा हैदोस, टोळक्यांनी दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात मध्यरात्री खळबळ

पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन संपणार ?

धरणातील या पाणीसाठ्याच्या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट कमी होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे टेन्शन संपण्याची शक्यता आहे. काही दिवसातच वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो.

Pune Dam Water Level
Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com