Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटात जोरदार राडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली.या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Vishal Gangurde

मुंबई एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटात जोरदार राडा झालाय

दोन्ही गटात झालेली हाणामारी कॅमेऱ्यात कैद

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी मोठी राडा झाला. सदावर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एसटी बँकेच्या संचालक मंडळात अडसूळ यांचा शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात आधीपासून वाद आहेत. याआधीही सदावर्ते यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आधीच झाले आहेत. मात्र, बँकेच्या बैठकीत अपमानास्पद भाषा बोलल्याने राडा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

एसटी बँक या आधी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या ताब्यात होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते निवडणुकीत उतरले. या निवडणुकीत सदावर्ते गटाचे उमेदवार विजयी झाले. निवडून आल्यानंतर इतर सदस्यांनी सदावर्तेंवर संशय व्यक्त केला. गेल्या दोन वर्षात दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्याचे प्रकार घडले आहेत.

आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी झाली. या हाणामारीनंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आता नेमका बँकेच्या संचालक मंडळात कुठल्या मुद्यावरून राडा झाला, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सदावर्ते आणि शिंदे गटाच्या पॅनलनचे सर्व संचालक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले. यावेळी सदावर्ते यांच्या पॅनलच्या व्यक्तीकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अडसूळ यांच्या संचालकांच्या दिशेला बॉटल फेकून मारली. त्यानंतर या बैठकीत मोठा राडा झाला. या हाणामारीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

Pune Traffic: पुणेकरांठी महत्वाची बातमी! बोपदेव घाट आजपासून ७ दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकरामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडला हिशोब, वाचा राज ठाकरेंना काय दिले उत्तर

Clothes Cleaning Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या या 5 स्मार्ट टिप्स तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

SCROLL FOR NEXT