Grampanchayat Election Result 2023  Saam TV
मुंबई/पुणे

Grampanchayat Election Result 2023 : काटेवाडी अजित पवारांचीच, भाजपविरुद्धच्या लढतीत अजित पवार गटाने मारली बाजी

Katewadi Grampanchayat Election 2023 : काटेवाडीत भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळाला.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Baramati Grampanchayat Result 2023 News :

अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. अजित पवारांचं होम ग्राऊंड असेलल्या काटेवाडीत अजित पवार गटाला सत्ता कायम राखण्यात यश मिळालं आहे. काटेवाडीत  भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळाला.

अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॅनलने काटेवाडीतून विजय मिळवला आहे. काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आहे. महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजपने एकमेकांविरोधात पॅनेल उभी केल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडली. यातील एक बिनविरोध झाल्यामुळे ३१ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं होतं. हाती आलेल्या निकालानुसार बारामती तालुक्यातील ३१ पैकी मध्ये २९ ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे आहेत. तर २ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे.

अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायतील

  • भोंडवेवाडी

  • म्हसोबा नगर

  • पवई माळ

  • आंबी बुद्रुक

  • पानसरे वाडी

  • गाडीखेल

  • जराडवाडी

  • करंजे

  • कुतवळवाडी

  • दंडवाडी

  • मगरवाडी

  • निंबोडी

  • साबळेवाडी

  • उंडवडी कप

  • काळखैरेवाडी

  • चौधरवाडी

  • वंजारवाडी

  • करंजे पूल

  • धुमाळवाडी

  • कऱ्हावागज

  • सायबाचीवाडी

  • कोराळे खुर्द

  • शिर्सुफळ

  • मेडद

  • मुढाळे

  • सुपा

  • गुनवडी

  • डोरलेवाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Municipal Elections Voting Live updates : पुणे महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT