मुंबई/पुणे

Shasan Aplya Dari Program Cancel in Pune : पुण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम सलग तिसऱ्यांदा रद्द, काय आहे कारण?

Jejuri News : २३ जुलै म्हणजे येत्या रविवारी जेजुरी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार होता.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुणे जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम सलग तिसऱ्यांदा रद्द झाला आहे. २३ जुलै म्हणजे येत्या रविवारी जेजुरी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी हा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने कार्यक्रम पुढे ढकलला असल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

प्रशासनाने या कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली होती.जवळपास दहा हजार नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यादा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यात येणं टाळत आहेत का? उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजून एकदाही अजित पवार पुण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हा पुढे ढकलला जात आहे का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

SCROLL FOR NEXT