Mumbai News : डशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. मागील ४ महिन्यांत त्यांची ही तिसरी बदली आहे. तर १६ वर्षांच्या कारकिर्दीतील ही २१ वी बदली आहे.
तुकाराम मुंढे सध्या मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. २ जून रोजीच त्यांची याठिकाणी वर्णी लागली होती. मात्र त्यांची नियुक्ती आता कृषी विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
ऑगस्ट २००५ - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर २००७ - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी २००८ - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च २००९ - आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै २००९ - सीईओ, वाशिम.
जून २०१० - सीईओ, कल्याण.
जून २०११ - जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर २०१२ - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर २०१४ - सोलापूर जिल्हाधिकारी.
मे २०१६ - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च २०१७ - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी २०१८ - आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर २०१८ - सहसचिव, नियोजन.
डिसेंबर २०१८ - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी २०२० - आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट २०२० - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी २०२१ - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर २०२२ - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
२९ नोव्हेंबर २०२२ - नियुक्तीच्या प्रतीक्षेत
एप्रिल २०२३ - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
२ जून २०२३ - सचिव मराठी भाषा विभाग
नाशिक महानगरपालिकेला दीड महिन्यानंतर आयुक्त मिळाले आहेत. डॉ. ए. एन. करंजकर नाशिकचे नवे मनपा आयुक्त असतील. मनपा आयुक्त यांच्याबरोबर नव्या जिल्हाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जलज शर्मा नाशिकचे नवे जिल्हाधिकारी असतील. करंजकर हे आधी ईएसआयसी विभागात होते. तर जलज शर्मा धुळ्याचे जिल्हाधिकारी होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.