Pune Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. पुण्याचा कायापालट होणार असून रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर' उभारले जाणार आहेत.

Priya More
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

  • पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार

  • रेल्वे फाटकांऐवजी अंडरपास आणि फ्लायओव्हर उभारले जाणार

  • पीएमआरडीए आणि महारेलमध्ये महत्वाचा करार

वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएच्या हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग लवकरच बांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास लवकरच सुसाट आणि वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीए आणि महारेल यांच्यामध्ये सामंजस्य करार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेळोवेळी नवनवीन पाऊलं उचलली जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वेफाटक मुक्तीकरता महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग यांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्याऐवजी महारेल मार्फत करण्यात यावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत.

महत्वाचे म्हणजे पीएमआरडीएमार्फत हा प्रोजेक्ट महारेल यांच्याकडे सुपूर्त करण्यात यावा यासाठी महत्वाच्या बैठका झाल्या. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर सह्या केल्या.

या प्रोजक्टमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पुणे शहरातील अनेक रस्ते रेल्वेफाटकमुक्त होतील. परिणामी वाहतूक कोंडी होणार नाही आणि नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल. या प्रोजेक्टमुळे पुण्याचा कायापालट होण्यास मदत होईल आणि वाहतूक सुसाट होण्यास मदत होईल. या प्रोजेक्टमुळे पुण्याच्या विकासाला चालना देखील मिळेल. पुणेकरांना या प्रोजेक्टमुळे खूप फायदा होईल, असा विश्वास राजेशकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

SCROLL FOR NEXT