Pune Traffic Update: सावधान! पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना नो एन्ट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune heavy vehicle ban : पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDANSaam Tv
Published On

Pune traffic diversion routes for trucks : पुणे शहरात १० दिवस जड वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. १५ जून ते २४ जून यादरम्यान दहा दिवस पुणे शहरात जड वाहनांना नो एंट्री असेल. अपघात रोखण्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत पुण्यात जड वाहनाने ३० अपघातात झाले असून यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर जड आणि अवजड वाहनांना पुढील दहा दिवस पुणे शहरात बंदी असणार आहे. अत्यावश्यक वाहने सोडून जड आणि अवजड वाहनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
US attacks Indian ship : अमेरिकेचा भारतीय जहाजावर हल्ला, 3 खलाशांचा मृत्यू

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने - केडगाव चौफुला - न्हावरे - शिक्रापूर - चाकण मार्गे किंवा उरळी कांचन - कोरेगाव मूळ - आष्टापूर - शिक्रापूर - चाकण मार्गे वळविण्यात येणार आहेत.

मुंबईकडून सोलापूरकडे जाणारी वाहने - तळेगाव दाभाडे - चाकण - शिक्रापूर - न्हावरे - केडगाव चौफुला मार्गे जातील. मुंबई ते अहिल्यानगर वाहतूक : तळेगाव - चाकण - खेड - मंचर - आळेफाटा मार्गे किंवा नाशिक फाटा - भोसरी - चाकण - शिक्रापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

PUNE TRAFFIC DIVERSION ANNOUNCED FOR BAKRI EID PRAYERS AT GOLIBAR MAIDAN
Pune curfew : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ग्रामीण भागात १५ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com