Pune curfew : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ग्रामीण भागात १५ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

Pune Rural Section 37 : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनदरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, सभा, मिरवणुका, शस्त्रे बाळगणे आणि प्रक्षोभक भाषणांवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
Pune curfew News
Pune curfew News Saam Tv
Published On

Section 37 Imposed in Pune Rural : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरकारकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी गुरूवारी रात्री याबाबतचे आदेश लागू केले आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत अशी १५ दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दिनांक 13 जून 2026 रोजी रात्री 12.05 वा. पासून ते 26 जून 2026 रोजी 24 वाजेपर्यंत वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

Pune curfew News
Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका आदी इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.

Pune curfew News
संभाजीनगर जिल्ह्यात ७४ हजार महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पाहा आकडेवारी

तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना लागू राहणार नाही.

Pune curfew News
Cabinet Reshuffle: मोठी बातमी! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, या १२ मंत्र्यांचा पत्ता कट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com