Pune IT City Metro  saam tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Good News For Punekar: पुणेकरांच्या सेवेत लवकरच नवा मेट्रो मार्ग येणार आहे. हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. त्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

Priya More
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

  • २३ किमी लांबीचा हा मार्ग आयटी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार

  • प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली

  • पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय दरम्यान १२ स्थानकांवर सेवा सुरू होणार

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवेला नवीन मुहूर्त मिळाला आहे. ही मेट्रो सेवा जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. पण ही सेवा सुरू होत नसल्याने त्यांची वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होणार नाही. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक- खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीसमवेत राबविण्यात येत आहे. ही सेवा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते.परंतु, कामे अपूर्ण असल्याने ती सुरू झाली नाही.त्यानंतर अनेक मुहूर्त जाहीर करण्यात आले; परंतु गेल्या सव्वा वर्षात ही सेवा सुरू होऊ शकली नाही.खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये पुण्यात एका कार्यक्रमात या मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तेही फोल ठरले.

या प्रकल्प खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवर सेवा सुरू होण्यास पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ लागल्याने एकूण खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्चाचा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल (पीआयटीसीएमआरएल) कंपनी उचलणार आहे. गणेश खिंड रस्त्यावर मेट्रोचे काम करण्यास विलंब लागल्याने हा प्रकल्प रखडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

मेट्रो सेवा सुरू करण्याचे मुहूर्त -

१) मार्च २०२५

२) सप्टेंबर २०२५

३) डिसेंबर २०२५

४) मार्च २०२६

५) मे २०२६

६) १५ जून २०२६

७) १५ जुलै २०२६

८) जुलैअखेरीस अथवा ऑगस्टचा पहिला आठवडा

मेट्रोचा पहिला टप्पा -

माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बाणेर)

स्थानके – १२

लांबी – १३.३ किलोमीटर

सुरू होणे अपेक्षित – जुलैअखेरीस अथवा ऑगस्टचा पहिला आठवडा

मेट्रोचा दुसरा टप्पा -

बालेवाडी हायस्ट्रीट ते जिल्हा न्यायालय

स्थानके – ११

लांबी – १० किलोमीटर

काम पूर्ण होणे अपेक्षित – ऑगस्ट

दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी सगळ्यात मोठा मेट्रोचा मार्ग आहे. २३ किलोमीटर असणाऱ्या या मेट्रोच्या उद्घाटनासाठी प्रशासनाकडून प्रत्येक वेळी नवीन मुहूर्त शोधला जात आहे. यावेळेसही आता जुलैचा मुहूर्त शोधण्यात आला असून नवीन मुहूर्त ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातला आहे. या मार्गावरील अजून अनेक स्थानकांची काम सुरू आहेत. त्यामुळे आता नवीन मुहूर्तावर तरी पुणे हिंजवडी मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न विचारला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

SCROLL FOR NEXT