Pune Metro  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! आणखी २ नवीन मेट्रो स्थानके होणार, ठिकाण नेमकं कुठे?

Good News For Punekar: पुणेकरांसाठी गुड न्यूज आहे. पुण्यात आणखी दोन मेट्रो स्थानके तयार करण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकारक आणि जलद होईल. तसंच वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होईल.

Priya More

Summary -

  • पुण्यात आणखी दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार

  • बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही मेट्रो स्थानके तयार होणार.

  • सरकारने ६८३.११ कोटींचा खर्च मंजूर केला.

  • दक्षिण पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात आणखी दोन नवीन मेट्रो स्थानके होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने दोन नवीन मेट्रो स्थानकांना मंजुरी दिली आहे. सरकारने या मेट्रो स्थानकांसाठी तब्बल ६८३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुणे मेट्रोवर बालाजीनगर आणि बिबवेवाडी हे दोन मेट्रो स्थानके होणार आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये पुणेरांचा प्रवास सुखकारक होणार आहे. मेट्रोने प्रवास केल्यामुळे त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा- २ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरबालाजीनगर आणि बिबेवाडी ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार आहेत. ही दोन मेट्रो स्थानके उभारण्यासाठी आणि कात्रट मेट्रो स्थानकांचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यासाठी ६८३ कोटी ११ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या अतिरिक्त खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसंच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याचसोबत पुण्यातल्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.

या मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा २२७.४२ कोटी रुपये, 'ईआयबी'चे द्वीपक्षीय कर्ज ३४१.१३ कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज ४५.७५ कोटी रुपये आणि व्याज रक्कम राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज ६८.८१ कोटी रुपये अशा मिळून एकूण ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेबर बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे आणखी दोन मेट्रो स्थानके उभारण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी निवेदने देखील दिली आहेत. कात्रज मेट्रो स्थानक शेजारच्या पीएमपीएमएल बस स्थानकाशी जोडले जावे यासाठी त्याचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करावे लागणार आहे. नवीन दोन मेट्रो स्थानके उभारणीमुळे आणि बोगद्याची लांबी अंदाजे ४२१ मीटरने वाढविल्यामुळे ६८३.११ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT