Pune Metro : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो लाईन ३ सुरु होणार; कामाची मोठी अपडेट समोर

Pune Metro Line 3 : पुणे मेट्रोच्या लाईन ३ बाबत नवी अपडेट समोर आली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचे ८७% काम पूर्ण झाले आहे.
Pune Metro Line 3
Pune Metro Line 3x
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Maha Metro News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना लवकरच माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा प्रवास मेट्रोच्या माध्यमातून करता येणार आहे. या नव्या मार्गावरील मेट्रोची दुसरी चाचणी घेण्यात आली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ ची दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला २३.३ किलोमीटर लांबीच्या पूर्णपणे उन्नत मार्गावर आणि मान डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी घेण्यात आली होती.

Pune Metro Line 3
Kalyan News : मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळचा मुक्काम तुरुंगातच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पहिल्या यशस्वी चाचणीनंतर आता दुसरी चाचणी मान डेपो ते हिंजवडी फेज २ दरम्यान सुमारे ४० किमी प्रतितास वेगाने पार पडली आहे. या प्रकल्पाचे जवळपास ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही दुसरी चाचणी आगामी मेट्रो लाईनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि क्षमता दर्शवत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनची एकूण लांबी २३.३ किलोमीटर इतकी आहे.

Pune Metro Line 3
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! ओव्हरटेक करताना टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

पुणे मेट्रोचा 'वन पुणे विद्यार्थी पास' आता मोफत

पुणे महामेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो ही पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. मेट्रोच्या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा समूह आहे. २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत, पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'वन पुणे विद्यार्थी पास कार्ड' (KYC)' पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Pune Metro Line 3
Viral : विजेच्या तारेला स्पर्श अन् डोक्याला ठिगणी पेटली, २ सेकंदात ट्रकचालकाचा मृत्यू; पाहा थरारक Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com