Viral : विजेच्या तारेला स्पर्श अन् डोक्याला ठिगणी पेटली, २ सेकंदात ट्रकचालकाचा मृत्यू; पाहा थरारक Video

Rajasthan Viral Video : राजस्थानच्या उदयपूर येथे एक भीषण अपघात घडला. विजेच्या तारेला डोक्याचा स्पर्श झाल्याने एका ट्रक चालकाचा २ सेकंदांमध्ये मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
Rajasthan Viral Video
Rajasthan Viral Videox
Published On

Rajasthan Video : राजस्थानमधील उदयपूर येथे एक खळबळजनक घटना घडली. विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये हा ट्रकचालक ट्रकवर ताडपत्री लावत होता. यादरम्यान विजेच्या तारेला त्याचा चुकून स्पर्श झाला. विजेच्या धक्क्याने ट्रकचालक मृत्युमुखी पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२२ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास दाबोक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. उदयपूरच्या रिको औद्योगिक क्षेत्रातील मोदी केमिकस फॅकट्रीमध्ये एक ट्रक माल उतरवण्यासाठी आला होता. कारखान्याच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या ट्रकमधून सामान उतरवल्यानंतक ट्रकचा चालक रामलाल गदरी ट्रकवरील ताडपत्री नीट करण्यासाटी ट्रकवर चढला.

Rajasthan Viral Video
Nanded : लॉजमध्ये बहिणीला रंगेहात पकडलं, घाबरलेल्या तरुणीची लॉजवरुन उडी, भावाने तिच्या मित्राला भोसकलं; नांदेडमध्ये खळबळ

ट्रकवर ताडपत्री सरळ करताना चुकून रामलालच्या डोक्याला विजेच्या तारेचा स्पर्श झाला. विजेचा धक्का लागताच रामलाल ट्रकवरच कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओमध्ये डोक्याचा तारेशी संपर्क झाल्यानंतर रामलालच्या डोक्यातून एक जोरदार ठिणगी निघाल्याचे आणि तो ट्रकवर पडल्याचे पाहायला मिळते.

Rajasthan Viral Video
Pune : चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीच्या पोटात ठोसा मारला, पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात; पुण्यात भयंकर घडलं

रामलाल गदरीच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या ओळखीच्या लोकांनी कारखान्यासमोर गर्दी केली. कारखान्याच्या मालकाला नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी आंदोलन सुरु केले. सुरुवातीला रामलालच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. निषेध वाढल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यावेळेस रामलालचा मृत्यू कसा झाला हे उघडकीस आले.

Rajasthan Viral Video
Pune Daund : पुण्याच्या दौंडमधील कलाकेंद्र गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; गुन्हा दाखल, ६ महिलाही ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com