Pune : चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीच्या पोटात ठोसा मारला, पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात; पुण्यात भयंकर घडलं

Pune Shocking News : चारित्र्याच्या संशयावरुन सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला एका व्यक्तीने बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
pune crime news
pune crime newsx
Published On

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या एरंडवणे भागात एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पत्नीच्या तिच्या पतीच्या विरोधात अलंकार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी (वय ३५ वर्षे, राहणार एरंडवणे) याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. रवी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. रवी त्याच्या पत्नीचा सतत छळ करत असे. रविवारी (२० जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास रवीने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने पत्नीला मारहाण केली, या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाला.

pune crime news
Pune Daund : पुण्याच्या दौंडमधील कलाकेंद्र गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; गुन्हा दाखल, ६ महिलाही ताब्यात

रवीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. पत्नीच्या पोटावर जोरात ठोसा मारला. शिवीगाळ करत तिचे केस धरुन फटफटत नेले. मारहाणीदरम्यान तिच्या पोटातून रक्तस्त्राव व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर जखमी पत्नीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान मारहाणीमुळे गर्भपात झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

pune crime news
Palava flyover : २० दिवसांपूर्वीचा पलावा पूल 'खड्ड्यात'! मनसेच्या माजी आमदारानं केली व्हिडिओ पोलखोल, एकनाथ शिंदेंवर निशाणा

पुण्यामध्ये भीषण अपघात!

पुण्यातील सासवड-नारायणपूर रस्त्यावर भिवडी येथील चौधरी वस्तीजवळ एक भीषण अपघात घडला. डिझेल टँकरने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

pune crime news
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! ओव्हरटेक करताना टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com