Palava flyover : २० दिवसांपूर्वीचा पलावा पूल 'खड्ड्यात'! मनसेच्या माजी आमदारानं केली व्हिडिओ पोलखोल, एकनाथ शिंदेंवर निशाणा

Raju Patil Slams DCM Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पलावा उड्डाणपुलाच्या दयनीय अवस्थेवर धारेवर धरले आहे.
raju patil slams deputy cm eknath shinde over palava flyover
raju patil slams deputy cm eknath shinde over palava flyover saam tv
Published On

Dombivli : डोंबिवलीमधील पलावा पुलावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये पलावा उड्डाणपुलाची दयनीय स्थिती पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोबिंवलीमध्ये मागील काही महिन्यांमध्ये गर्दीचे प्रमाण वाढत आहे. गर्दी वाढल्यानंतर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पलावा उड्डाणपूल बांधण्यात आला. ४ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. पण अवघ्या काही दिवसात या पुलाची स्थिती खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे.

raju patil slams deputy cm eknath shinde over palava flyover
Pune Breaking : पुण्याच्या दौंडमध्ये कलाकेंद्रात गोळीबार कुणी केला? पोलिसांनी काय सांगितलं?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा कारभार बघा. ४ जुलै रोजी सुरु झालेल्या पलावा पुलाची आजची परिस्थिती ही अशी आहे, असे कॅप्शन राजू पाटील यांनी त्यांच्या एक्स पोस्टला दिले आहे. पुलाच्या रस्त्यावर खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचल्याचे राजू पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते.

raju patil slams deputy cm eknath shinde over palava flyover
Thane : पार्किंगचा वाद, शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखानं तलवार घेऊन राडा घातला; ठाण्यातला Video Viral

पलावा पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळीही मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. 'आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमध्ये विठ्ठल मंदिरात जाणार होते. ते ठाण्याहून हेलिकॉप्टरने पलावाला येणार होते आणि तिकडून शहाडला विठ्ठल मंदिरात जाणार होते. ते हेलिकॉप्टरने भिवंडीला गेले. तेथून कल्याणला आहे. ते या पलावा पुलावरुन आले असते, तर त्यांना पुलाची परिस्थिती कळाली असती, असे वक्तव्य मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केले होते.

raju patil slams deputy cm eknath shinde over palava flyover
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! ओव्हरटेक करताना टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com