Pune Metro: मेट्रोनं पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट, काही मिनिटात पोहोचा पिंपरी-चिंचवडहून स्वारगेट

Pune Khadki Metro Station: पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
Pune Metro
Pune Khadki Metro Stationsaam tv
Published On

पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शहरातील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. या दोन्ही ठिकाणांमधील मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामुळे खडकी, पुणे विद्यापीठ, औंध परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

खडकी मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्याने आणि या मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यानं मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य झालंय. यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रोचा लाभ घेणं सुलभ झालंय.

Pune Metro
Mumbai Aqua Metro : आरे कॉलनीतून थेट CSMT! १७ लाख प्रवाशांसाठी Metro 3 सज्ज; जाणून घ्या तिकीट दर, स्थानकं आणि सर्व माहिती

हे मेट्रो स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली असल्याच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले.

महा-मेट्रोने पुणे मेट्रो सेवा लोहगाव विमानतळ आणि शहराच्या विस्तारित दक्षिण उपनगरे - कोंढवा, उंड्री, एनआयबीएम आणि येवलेवाडी यासारख्या प्रमुख भागात विस्तारित करण्याची योजना जाहीर केलीय. प्रस्तावित विस्तारात विद्यमान रामवाडी स्थानकापासून लोहेगाव विमानतळापर्यंत ३ किमीचा विस्तार समाविष्ट आहे.

याचा उद्देश हवाई प्रवाशांना थेट आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक प्रदान केली जाईल. यासह सिव्हिल कोर्ट इंटरचेंज ते येवलेवाडी पर्यंत २० किमीचा कॉरिडॉर देखील प्रस्तावित आहे, जो एनआयबीएम आणि इतर वेगाने विकसित होणाऱ्या निवासी क्षेत्रांना जोडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com