Pawana Dam Water Storage Saamtv
मुंबई/पुणे

Pawana Dam: आनंदवार्ता! पवना धरण १०० टक्के भरलं, पिंपरी-चिंचवडकरांचे टेन्शन मिटलं

Pawana Dam Filled 100 Percent: मावळमध्ये असलेले पवना धरण १०० टक्के भरले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळमधील नागरिकांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

मावळ आणि पिंपरी चिंचवडकर यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कारण पिंपरी-चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पिंपरी -चिंचवडकर आणि मावळच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरल्याने पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळाशी गेलेले पवना धरण शंभरीच्या जवळपास पोचले होते. . उशिरा का होईना धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी पवन मावळ, तळेगाव, देहूरोड या भागासह पिंपरी चिंचवड शहर आणि एमआयडीसी भागात दिले जाते. साडेआठ टीएमसी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात आत १३००६८ मिली मिटर या मोसमात पाणीसाठा तयार झाला आहे. पाण्यावर पवन मावळ्याची शेती देखील होते. असे हे अतिशय महत्त्वाचे धरण भरल्याने मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांपैकी ३ धरणं १०० टक्के भरली आहेत. तर खडकवासला धरण १०० टक्के भरण्यासाठी २ टक्के कमी आहेत. जर पुण्यामध्ये पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरण ९८ टक्के भरले. वरसगाव, टेमघर आणि पानशेत धरण १०० टक्के भरले. पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT