मावळ : मावळ तालुक्यासह संपूर्ण पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा ९३.६४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून केला जाणारा विसर्ग आता थांबविण्यात आला आहे.
मागील आठवडाभरात मावळ तालुक्याला पावसाने झोडपले होते. यामुळे पवना धरणात (Pavana Dam) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. परंतु सध्या मावळ तालुक्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. अधून मधून रिमझिम स्वरूपात पाऊस (Rain) होत आहे. त्यामुळे मागील २४ तासांत पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.
पाण्याची चिंता मात्र मिटली
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पवना धरण ९३.६४ टक्के इतके भरलेले आहे. यामुळे मावळवासीय तसेच औद्योगिक नगरी असलेल्या (Pimpri Chinchwad) पिंपरी- चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. आगामी काही दिवसात आणखी पाऊस झाल्यास धरणाची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.