Pune : दुर्दैवी ! पोरगं बुडतंय म्हणून बाप धावला, गणरायाला निरोप देताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू

Maval News : गणपती मूर्तीचे विसर्जन करत असताना बाप लेकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
drowning
drowning Saam Digital
Published On

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी, मावळ

Maval Father And Son Drowned In Water : बाप्पाच्या आगमनाने राज्यातील वातावरण भक्तिमय झाले असून पाच दिवसांच्या गणरायाला गुरुवारी आनंदाश्रूंनी निरोप देण्यात आला. साश्रुनयनांनी गणरायाला निरोप देत, पुढच्या वर्षी लवकर या... अशी आर्त विनवणी गणेशभक्तांनी केली. मात्र पुण्यात घरगुती विसर्जनाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना वडील आणि मुलगा एकत्र पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लेकरू डोळ्यांसमोर बुडत असल्यामुळे बाप त्याला वाचण्यासाठी मदतीला धावला. पण दुर्देवी दोघांचाही मृत्यू झाला.

पुण्यातील मावळमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. मावळात घरगुती गणपती मूर्तीचे घरामागील खड्यात साचलेल्या पाण्यात विसर्जन करताना बाप लेक बुडाले. मावळमधील कडधे या गावात ही घटना घडली. मुलगा डोळ्यासमोर बुडायला लागला म्हणून वडिलांनी झेप घेतली. पण दोघेही वाहून गेले. या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

drowning
Ganesh Chaturthi : सूरतमध्ये गणपती मंडपावर दगडफेक, लोकांनी पोलीस चौकीला घेरलं, ६ जणांना अटक

नेमकं काय घडलं?

संजय धोंडू शिर्के ( वय 45) आणि हर्षल संजय शिर्के ( वय 20) असे बुडून मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत.

कडधे गावात हे बाप-लेक घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते. विसर्जनावेळी आपला मुलगा हर्षल बुडत असल्याचे वडिलांना दिसले. त्यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकाने धाव घेतली.

ही घटना कामशेत पोलिसांना कळताच मावळ वन्य जीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या सदस्यांनी रात्री उशिरा या दोघांचे मृत्यू देह पाण्यातून बाहेर काढले , त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मावळमधील या घटनेमुळे गणपती विसर्जन करताना काळजीपूर्वक करावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेय.

drowning
Marathi News Live: तीन व्यक्तींमधील आपापसातील मारामारीनंतर एकाच मृत्यू तर दोन जण फरार, रायगडमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com