तीन व्यक्तींमधील भांडण आणि मारामारीनंतर एकाचा मृत्यु झाल्याची घटना माणगाव रेल्वे स्थानकानजीक दुकानानाच्या शेडमध्ये घडली. गुरुवारी सकाळी अंगावर हत्याराच्या जखमा असलेला मृतदेह दिसून आल्यानंतर सदर घटना समोर आली असून दुकानातील CCTV मध्ये भांडण आणि मारामारी चित्रीत झाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात या मारामारीतील इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करून माणगाव पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला नामदार गोपाळ कृष्ण गोखले पूल हा बाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. गोखले पूल पुनःनिर्माणांतर्गत (फेस-२) पुलावरील उत्तरेकडे टाकलेली पोलादी तुळई हटविण्याचे काम तात्काळ करणे आवश्यक असल्याने १२ सप्टेंबर ते दि. १५ सप्टेंबर पर्यंत वेळ रात्री ००.०० वा. ते पहाटे ४.०० (फक्त रात्रौ) वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना बंद राहणार आहे. यामुळे नागरिक आणि वाहन चालकांची अडचण होणार असल्याने नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं सांगण्यात आले आहे.
सोलापूर रोडवर काळू बाई चौकात पी एम पी एम एल च्या इलेक्ट्रॉनिक बसला अचानक आग लागली आहे, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
स्वामी कैलासनंदगिरी महाराजांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथेही घटना घडलीय. तुमची बदनामी करू, असे म्हणत आरोपींनी केली पैशांची मागणी केली होती. विविध हत्यारे घेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडालीय.
कोल्हापूर जिल्ह्यात 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलीय. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम 163 (१) लेझर वापरावर बंदी असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांचे आदेश आहे.
जिल्हा मुख्यालयात आंदोलन करण्याच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश आहेत. भाजप नेता तरविंदरसिंह मारवा आणि भाजपविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजेपासून राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाणार आहे. तरविंदरसिंह मारवा याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
पुणे कोलाड रस्त्यावर भुकूम ( ता. मुळशी ) येथील गारवा हॉटेल समोर डंपरने दुचाकीस धडक दिलेल्या झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले. डंपरचा चालक फरार झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल काळू सुर्यवंशी व पत्नी प्रिया रा. लवळेफाटा अपघातात जागीच ठार झाले. हा अपघात गुरवारी रात्री एक वाजता झाला. डंपर भुकूमवरून भूगावकडे चालला होता. तसेच सुर्यवंशी भूगावरून भुकूमकडे चालले होते. डंपर चालकाने अविचाराने, हयगईने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. भरधाव वेगाने तो डंपर चालवत होता. मोटार सायकलला समोरा समोर धडक दिल्यामुळे दोघे पती पत्नी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक पवित्रा घेणार आहे. ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा नारा देत भाजपकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजाताई मुंबईत आंदोलन करणार आहेत. रवींद्र चव्हाण ठाण्यात तर गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार आहेत. तर पुण्यात चंद्रकांत पाटील तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.
आज दुपारी तीन वाजता एका इसमाने ठोसरपागा येथील घाटावरुन पाण्यात उडी मारल्याचे समजताच अग्निशमन दलाकडून गणेश उत्सवानिमित्त विविध घाटांवर तैनात असलेल्या जवानांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. इसमाने अचानक पाण्यात उडी मारल्याने एकच आरडाओरडा सुरू होताच तिथेच नजीक असलेले फायरमन जितेंद्र कुंभार आणि शैलेश दवणे यांनी जीवरक्षक संदिप शिंदे, कपाल भोईटे, दत्तात्रय चिनके, संतोष गायकवाड यांच्या मदतीने पाहिले असता हा व्यक्ती पाण्यामध्ये असल्याचे पाहताच लाईफ जॅकेट व लाईफ रिंग आणि रश्शी टाकत त्याला सुखरुप पाण्याबाहेर घेतले.
पाच दिवसांच्या गणरायांच विसर्जन आज साता-यात करण्यात आलं. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन सुद्धा आज करण्यात आलं. साता-यातील हुतात्मा स्मारकाच्या शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या कृत्रिम तलावात शंभुराज देसाई यांनी बाप्पांची मनोभावे आरती करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात बाप्पांना निरोप दिला.
गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात ५५०० पोलीस तैनात करण्यात आलेत. विसर्जनासाठी पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. संपूर्ण शहरात १७ सप्टेंबर रोजी ५५०० पोलीस तैनात राहणार आहेत. ४ अप्पर पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, २३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ पोलीस निरीक्षक, ५६८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४६०४ पोलीस कर्मचारी, १००० होमगार्ड, राखीव पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी असणार आहे.
न्यायालयात पुजा खेडकर शपथेवर खोटे बोलल्याचा आरोप.
युपीएससीच्या दाव्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाची पुजा खेडकरला नोटीस
युरीएससीने उमेदवारी रद्द करण्याचा आदेश मला दिलेला नाही. असे शपथपत्र
पुजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दिले होते.
ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे अशा हरित लवादाने (NGT) दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
कविता राऊत यांची मुख्य कार्यकारी अधिकरी प्रशिक्षक म्हणून थेट नियुक्ती करण्यात आलीय. मात्र कविता राऊत यांनी ही नियुक्ती अमान्य केली आहे. जुन्या धोरणानुसार उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अथवा आदिवासी विकास विभागात नियुक्तीची मागणी करण्यात आलीय. शासनाने केलेल्या नियुक्तीवर कविता राऊत यांची नाराजी आहे. सरकारच्या नियुक्ती विरोधात न्यायालयीन लढा देण्याची कविता राऊत यांची तयारी केलीय.
एकमार्गिकाचे काम पूर्ण झाले आहे उद्यापासून सर्वसामान्य नागरिक या रस्तावरुन प्रवास करू शकणार
या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन, नागरिकांना मरिन ड्रायव्ह वरुन वांद्रेत १२ मिनिटात पोहचता येणार असून यामुळे ७०% वेळ व ३०% इंधनाची होणार बचत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा राहणार उपस्थित.
आरटीई 25% योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश ऐनवेळी रद्द केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने धाराशिवच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम त्यांच्या पगारी खात्यातून दोन याचिका कर्त्यांना देण्याबाबत उच्च न्यायालयाने सांगितले आहे.या सुनवानी दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत आता पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.धाराशिवचे गटशिक्षणाधिकारी आसरार सय्यद यांनी 22 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया केली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले या निर्णयाच्या विरोधात धाराशिव मधून विद्यार्थ्यांच्या पालकांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना आज 'सागर' बंगल्यावर बोलवले आहे. संध्याकाळी गणपती दर्शनानिमित्त आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनऔपचारिक संवाद फडणवीस साधणार आहेत. तसेच आमदारांबरोबर चर्चेदरम्यान फडणवीस मतदारसंघाची माहिती घेणार आहेत.
आमच्या हिंदुत्वाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही..आम्ही मुस्लिमांच्या विरोधातले नाहीत, शेजार धर्म पाळणारे आम्ही शिवसैनिक आहोत.. त्यामुळं शिवसेनेचं हिंदुत्व जोडणारे आहे तोडणार नाही..असं म्हणत राज्याच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय, ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते..
फुरसुंगी आणि देवाची उरुळी ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याच्या शासनाच्या निर्णयावरून स्थानिक पातळीवर महायुतीमध्येच वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपविरोध शिंदेंची शिवसेना असा वाद रंगल्याचे पाहायला मिळत असून भाजपने आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. गावे वगळल्यास गावांच्या विकासकामांवर दीर्घकालीन परिणाम होणार असल्याने 70 टक्के गावकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतरही शासनाने गावे वगळण्याचा निर्णय घेतल्याने या विरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे
पिकांना सिंचनासाठी लावलेला विद्युत मोटार पंप विहिरी तून बाहेर काढण्यासाठी शेतातील विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली.भंडारा जिल्ह्याच्या परसोडी नाग शेत शिवारात घडली. या घटनेत स्थानिक परसोडी नाग येथील रामचंद्र टिकाराम बावनकुळे वय (५७) वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
RSS प्रमुख मोहन भागवत यांनी शिवाजी महाराज समाधी महात्मा फुले यांनी नव्हे तर लोकमान्य टिळकांनी शोधली असा दावा केला होता त्याविरोधात आज RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी फुले,शाहू व आंबेडकर प्रेमींनी एकत्र येत मोहन भागवत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला,बहुजनाचा इतिहासाला मोडतोड करून प्रस्तुत करण्याच्या कुटीलवादी हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला तर जातीजातीत भांडण लावण्याचा हा डाव असून समाजात तंटे लावण्याच काम मोहन भागवत करत असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान महात्मा फुले यांचे फोटो हातात घेत आंदोलन करण्यात आले,
पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरुये पण आढळराव मात्र कुठं ही दिसून आलेले नाहीत. मात्र हेच आढळराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेंव्हा अन आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते. लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधतायेत. त्यामुळंच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते.
तळोदा शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शहरातील खड्ड्यांच्या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील पालिका खड्डे बुजवत नसल्याने नागरिकांकडून खड्ड्यांची विधिवत पूजा करत खड्ड्यांमध्ये बसून पालिकेच्या विरोधात आंदोलन केलं, आहे नागरिकांनी गांधीगिरी करत केलेल्या आंदोलनाची मोठी चर्चा जिल्हाभरात होती जिल्ह्यातील नगरपालिकेची मुदत संपली असून नगरपालिकेवर प्रशासक राज असून प्रशासकांकडून पालिकेच्या विकास कामासंदर्भात शहरातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होण्याची शक्यता कमीच
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपत्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल आहे याचिका
प्रकरण नंबर १ वर अजूनही सविस्तर सुनावणी सुरू असल्याने याप्रकरणी सुनावणी होण्याची चिन्ह कमी
आज सायंकाळी या सुनावणीची नवी तारीख समजणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळ दाखल झाल्या आहेत याचिका
परभणी पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर गंगाखेड पोलिसांनी शहरालगत नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीत शहरातील परळी नाका येथे दहा टन गोमांस वाहतूक करणारे आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला. शहरातील परळी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे, पोलिस कर्मचारी सावंत, मामीलवाड होमगार्ड पवार, गिराम, साबणे कर्तव्यावर होते. प्रत्येक वाहनाची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत होती.
परभणी येथून गंगाखेडच्या दिशेने येणारा आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.एच.२० इ.एल. ९१०७ थांबवण्यात आला. चालकाला चौकशी केली असता वाहनात भंगार असल्याचे सांगण्यात आले. परंतु वाहनातून पाणी गळत होते. व वास आल्यामुळे पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली. यामध्ये भंगार साहित्याच्या गोण्या पलीकडे दहा हजार किलो वजनाचे गोमांस आढळून आले. ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये एवढीसांगितले. पोलिसांनी २५ लक्ष रुपयांचे गोमांस व पाच लक्ष रुपयांचे वाहन असे एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन ईसमाना ताब्यात घेण्यात आले.
पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर पोलिसांनी विक्रीसाठी आणलेला अवैध दारू साठा पकडला. कारवाईत पोलिसांकडून दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं पिकअप वाहन असा जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करत चेतन दत्तात्रय खांडेकर आणि विजय भीमराव राठोड असं आरोपीना केली अटकमिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खेडशिवापुर पोलिसांनी केली कारवाई
विविध बँडच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, बिअरच्या कॅन आणि एक महिंद्रा पिकअप गाडी केली जप्त..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम तयार करण्यासाठी इंटरनॅशनल पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे
या पोर्टलवर आत्तापर्यंत 423 कंपनी नोंदणी केली आहे.त्यात आयटी उत्पादन, ऑटोमोबाईल,आरोग्य,शिक्षण,ऊर्जा,सेवा अशा साधारण 61 क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष पावले उचलणारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले राज्य सरकारी विद्यापीठ ठरले आहे.त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना विद्यावेतनही देण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 ची अंमलबजावणी राज्यसह देशात सुरू झाली आहे.या धोरणा अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन्यपूर्ण शिक्षणासह कौशल्यवर आधारित आणि रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा भर आहे.
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या तांत्रिक समितीत आता दोन केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय इमारत निर्माण आणि संशोधन केंद्राचे संचालक प्रदीप कुमार आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश खरे या दोन अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. तर या दुर्घटने मागील दोषी शोधण्याचं काम नौदलाचे कंमाडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे.
गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद पडले असून सकाळी 10 वाजता कोटगल बॅरेज येथे पुरात अडकलेल्या 30 जणांना रेस्क्यू करत बचाव पथकाने बाहेर काढले. वैनगंगा नदीवर कोटगल बॅरेजचे काम सुरू असून काही कामगार येथेच अडकून होते. पूर आणखी वाढत असल्याने त्या सर्वांना बचाव पथकाने बाहेर काढले.
बीफ कटलेटच्या मुद्द्यावर खा. संजय राऊत विरोधात आता विश्व हिंदू परिषद आक्रमक
- “संजय राऊत यांनी बिफ कटलेटचा पुरावा द्यावा अन्यथा संजय राऊत विरोधात FIR करणार”
- विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष नंदकिशोर दंडारे यांचा इशारा
- “व्हीएचपी गोहत्या विरोधात मोहिम चालवते, नागपूरात हिंदूंच्या हॅाटेलमध्ये गोमांस मिळत नाही”
- “संजय राऊत यांनी बीफचे पुरावे द्यावे, आम्ही स्वतः कारवाई करा यासाठी पुढाकार घेऊ”
- “संजय राऊत हिंदू धर्मात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे”
भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस जनतेला लुटणारे पाकीटमार, मुंबईसह अनेक ठिकाणी लागले पोस्टर
मुंबई, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, हिंगोली, अहमदनगरसह राज्यभरात लागले पोस्टर
महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारी पोस्टर्स
सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसल्याने पोस्टरच्या माध्यमातून संताप
अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत
मुंबई प्रेस क्लबच्या समोर, अंधेरी पूर्व या भागासह संपूर्ण शहरभर अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत
आज खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेड विमानतळावर राऊत यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. राऊत यांचच्या स्वागतासाठी शिवसैनिक नांदेड विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झाले परंतु या सर्व शिवसैनिकांना विमानतळाच्या आत प्रवेश पोलिसांनी नाकारला. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी देखील अडवण्यात आली.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आणून ठेवला. तब्बल 2 तास या ठिकाणी हा गोंधळ सुरू होता. रेखा गायकवाड असं मृत महिलेचे नाव असून विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान जोपर्यंत संबंधित डॉक्टरांच निलंबन केलं जात नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून मृतदेह हलविला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र कारवाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी सदरील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला...
उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात आळंदीपासुन केली आहे. आळंदी नगर पालिकेच्या शाळा क्रमांक चार भुमी पुजन आज सकाळी अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी आळंदी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा उभारणीसाठी आणखी निधी हवा काय, अशी विचारपुस केली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडे निधी नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे विकास कामासाठी अतिरिक्त निधी मी देतो., अशी विचारपुस सत्ताधारी अजीत पवार करत आहेत. अजित पवार हे आज खेड तालुका दौऱ्यावर आहेत. आपल्या खेड तालुका दौऱ्या दरम्यान अजित पवार हे विविध विकास कामांचउद्घाटन करणारं आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून भामरागड मध्ये पूरस्थिती होती. आज पूर पूर्णतः ओसरला असून सर्वत्र पुराची गाळ साचल्याने राहदरीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून जेसीबीव्दारे गाळ हटविण्याचे काम सुरूआहे. बाजारपेठेत अग्निशमन बांबद्वारे पाणी मारून रस्ता स्वच्छ केला जात आहे. पर्लकोटा नदी पुलापर्यत आताही पाणी वाहत असले तरी पूर ओसरल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे उत्तर गडचिरोली भागातील, गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील पूरस्थिती आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 10 मार्ग बंद आहेत.
मनमाड जवळच्या अंकाई किल्ला परिसरात शिवाजी गरुड हे कुटुंबे राहतात नेहमीच या ठिकाणी बिबट्याची दहशत असल्यामुळे या कुटुंबाने आपल्या घराजवळ सीसीटीव्ही बसवला आहे या सीसीटीव्ही मध्ये एक मादी बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास घराजवळ वावरताना आढळून आला असून या मादी सोबत दोन पिल्ले ही असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान कुत्रा भुंकल्यानं या बिबट्याने धुवून ठोकल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस आज सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत अनौपचारिक गप्पा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून, बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सर्व आमदार आज सागरवर आहेत. संध्याकाळी गणपती दर्शनाच्या निमित्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व आमदारासोबत फडणवीस चर्चा करणार आहेत.
नाशिकमध्ये श्री गणेशाच्या विसर्जनासाठी 5 हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आलीय. विसर्जन मिरवणूक मार्गावर दोनशे सीसीटीव्ही, शिवाय सहा ड्रोनचा वॉच असणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. एसआरपीएफच्या ६ तर आरसीपीच्या २ तुकड्या तैनात असणार आहेत. पोलीस आयुक्तांपासून ते प्रशिक्षणार्थी पोलिसांपर्यंत असणार बंदोबस्त, पोलिसांच्या मदतीला होमगार्ड देखील ऑन ड्युटी असणार आहेत.
मुंबईतून एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या लहान मुलांना देण्यात आलेल्या सीलबंद ऑरेंज ज्यूसच्या बाटलीत डास आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 9 सप्टेंबर रोजी जोगेश्वरी पश्चिमेकडील आदर्श नगर येथे वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीत आलेल्या लहान मुलांना आयोजकांकडून बिग किड्स ऑरेंज हे पेय देण्यात आले. वैष्णवी कसाळकर नावाच्या मुलीच्या हातात आलेल्या ज्यूसच्या सीलबंद बाटलीमध्ये काहीतरी संशयास्पद दिसून आल्याने तिने आपल्या आई-वडिलांना ती ज्यूसची बाटली दाखवली असता त्यात डास आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा पुराच्या पाण्यात स्टंट करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाने उसंती घेतली असली तरी पूर परिस्थिती आता पण जील्हात आहे. तुमसर तालुक्यातील पूर परिस्थितीच्या पाहणी करण्याकरिता खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे आले होते,त्यादरम्यान त्यांनी हा स्टंटबाजी केली असून त्यांचा कार्यकर्तानी ही रील तैयात केली. सध्या नागरिक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत,तर खासदार पडोळे असल्या रील काढत आहे,त्या मुळे नागरिकांन मध्ये रोष निर्माण होत आहे.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिपक बोर्हाडे या आंदोलकाची प्रकृती बिघडली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या दिपक बोर्हाडे,माऊली हळणवर या उपोषणकर्त्यांची प्रकृति बिघडली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून त्यांच्या हातापायाला मुंग्या येत आहेत. अशातच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. चार दिवसा नंतरही सरकारचे आंदोलकाकडे दुर्लक्ष केल्याने समाजामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील गणेश विसर्जनासाठी साडेपाच हजार पोलिसांचा फौज फाटा
अनंत चतुर्दशीला भक्ती भावाने निरोप देताना कडेकोट बंदोबस्त राहणार
अप्पर पोलीस आयुक्त4 पोलीस उपायुक्त,10 सहाय्यक पोलीस आयुक्त,23, पोलीस निरीक्षक,128 सहाय्यक पोलीस निरीक्षक 568 पोलीस कर्मचारी,4604, होमगार्ड 1000, राखीव पोलीस दल 1 तुकडी बंदोबस्ताला असणार
1800 सीसीटीव्ही कॅमेरे, 18 पोलीस मदत केंद्र सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणार.
- शरद पवारांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात मोठी अपडेट
- सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्यात काही अटी
- शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत झाली बैठक
- केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार,
- कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार,
- शिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
- यासह काही अटी शर्थीचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर
- या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार
- केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजी नगर शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी आता वाहतूक शाखेचे पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. काल दिवसभरात 480 रिक्षांची तपासणी करून त्यापैकी 113 रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नियम लावून प्रवाशांसोबत चांगली वागणूक ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र काल एका महिलेला रिक्षा चालकाने जाणून गल्लीबोळातून घेउन जाण्याचा प्रकार घडला होता.आणि त्याला भर रस्त्यात चांगलाच चोप महिलेने दिला.त्यानंतर वाहतूक शाखेने ही कारवाई करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाची शिवस्वराज यात्रा आज गडचिरोलीत पोहचत आहे. या यात्रेत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर तुतारी फुंकणार आहे. त्यामुळे एक प्रकारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
- विदर्भातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावले...
- नागपुरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला होता.
- पक्षाचे मंत्री जिल्हा प्रमुखांची कामे करत नाही तसेच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला होता.
- विदर्भातील या जिल्हाप्रमुखांची नाराजी पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचली असून त्यांना मुंबईत येण्यास सांगितले आहे.
- पक्षाने गणेश उत्सवानंतर सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलावले आहे.
भुसावळ विभागातील गाळण (ता. पाचोरा) येथील रेल्वे स्थानकात अप व डाऊन मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी १२, १३ व १४ असे तीन दिवसांत जवळपास १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे- नागपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे.या नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आले
पावसाळा, खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे. यातून बुलढाणेकरां ची सुटका कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय...
बुलढाणा ते नागपूर या महा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालीय.. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत.. वाहन चालकाना मोठी कसरत करावी लागत आहे.. तसेच दररोज अपघात होत आहे .. अनेक गंभीर जखमी झाले आहेत ..
पुढील दोन दिवस दक्षिण कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो. पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा ,प्रफुल पटेल ,दादा भुसे व उदय सामंत यांच्यात बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक
राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकिला विशेष महत्व...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणार्या जागांवर बैठकित सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.
त्याच बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तरचर्चा करण्यात आल्याची सूत्रांची महिती
कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण. आज होणार लोकार्पण.
या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन, नागरिकांना मरिन ड्रायव्ह वरुन वांद्रेत १२ मिनिटात पोहचता येणार असून यामुळे ७०% वेळ व ३०% इंधनाची होणार बचत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा राहणार उपस्थित.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रिप्टो करन्सीसाठी अनेक तरुणांच्या खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफास केलाय. बंदी असलेल्या क्रिप्टो करन्सीला भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा वापर केला जात होता. या बँक खात्यावर पैसे डिपॉझिट केले जात होते. मग, विद्यार्थ्यांच्याच डेबिट कार्डद्वारे आरोपी स्वतः पैसे काढून घ्यायचा. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना ७ टक्के कमिशन देण्याचा हा गोरखधंदा मागील २ वर्षांपासून सुरू होता. त्यासाठी महाविद्यालयीन तरुणांच्या नावे बँक खाते उघडून विविध राज्यांमधून त्याद्वारे व्यवहार करायचा. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातील दोन तरुणांना बुधवारी अटक केली. त्यातील एक उत्सवकुमार भेसानिया (२३) हा सुरतचा आहे. त्याचे दुबईतील दिव्येश दर्जीशी काही लागेबांधे आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत. उत्सवकुमार शिवाय उर्वरित दोन आरोपींमध्ये संभाजीनगर शहरातील ऋषिकेश शिवनाथ भागवत आणि अनुराग भाऊसाहेब घोडके यांचा समावेश आहे.
- बाहेरून केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीतून नागपूरात दाखल
- नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डात नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू
- नागपूर - सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत हाय स्पीड ट्रेनला पंतप्रधान मोदी 15 सप्टेंबरला दाखवणार हिरवी झेंडी
- नागपुरातून पहाटे 5 वाजता निघून सिकंदराबादला दुपारी 12.15 वाजता पोहचणार तर सिकंदराबादहून 1 वाजता निघणारी वंदे भारत संध्याकाळी 8.20 वाजता नागपुरात पोहचणार
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक श्रीं ना अर्पण करण्यात आला. श्रीं समोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला.
मालाणी परिवारातर्फे दरवर्षी हा मोदक अर्पण केला. साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक साकारण्यात आला होता.
यवतमाळच्या पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोस्ट वाॅन्टेड असणाऱ्या करणसिंग दुलसिंग जस्सोल राहणार जगतपूर,जयपूर राजस्थान यास मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. पुसद येथे एका नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये मुलांना शिक्षण देत होता 2021 मध्ये त्यांच्यावर अमली पदार्थ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता, त्यांच्या मोबाईल लोकेशन वरून त्यांचा शोध घेतला असता दहशतवाद विरोधी पथक मुंबईच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले या आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
बुलढाण्याच्या खामगाव शहरातील अडद व्यापारी दिलीप सुराणा यांच्या दुकानात ठेवलेली नऊ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे, आपल्या मित्राच्या मदतीने चोर चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत...रहदारीच्या ठिकाणी असलेल्या दुकानात चोरी झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रात अण्णाभाऊ बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी होर्डिंग लावल्या आहेत. आपले अण्णा, पिंपरी पुन्हा या आशयाच्या होर्डिंग अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लावल्या आहेत. मात्र या होर्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वपूर्ण नेते मंडळीचे छायाचित्र देखील वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णा बनसोडे यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ? अण्णा बनसोडे हे अजित पवार यांना जय महाराष्ट्र करत तुतारी हाती घेतील का ? अशी देखील चर्चा पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये रंगू लागली आहे.
छत्रपती संभाजी नगर महापालिकेने यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केलय. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा वसुलीचा टक्काही वाढला मात्र वारंवार सूचना देऊनही पालिकेतील अनेक लिपिक वसुली कमीच करत असून त्यांच्या वसुलीचा आकडा वाढत नसल्याने मनपा प्रशासकांनी त्यांना आता बडतर्फ करण्याचा इशारा दिलाय.महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून उत्पन्नाचे प्रमूख स्रोत हे मालमत्ता कर आणि पाणी पट्टीच आहे. परंतु या वसुलीत दरवर्षीच पालिका प्रशासन नापास होत आहे. त्यामुळे मागील वर्षापासून मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्वतः कर वसुलीवर भर दिलाय. दरम्यान महापालिकेतील वसुलीच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर वसुलीचे काम हे अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याच त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा कडक इशारा लिपिकांना दिलाय. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली
खामगाव तालुक्यातील कारेगाव बु. येथील 7 वर्षीय यश अरुण बोदडे हा स्थानिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता, त्याचा नदीवरील पुलावरून खाली नदीप्रवाहत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यश आपल्या मित्रांसोबत खेळत असताना नदीवरील पुलाजवळ पोहोचला. खेळताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याच्या वेगामुळे तो मोरीतून वाहून गेला
गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने त्याचा शोध घेतला मात्र सापडला नाही...
काही तासांनंतर, गावातील शोध पथकाला नदीपात्रात नवीन पुलाच्या मोरीत अडकलेला दिसला. त्याचा मृत्यू झालेला होता या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
यश अरुण बोदडे याचा मृतदेह तात्काळ पोस्टमार्टेमसाठी रवाना करण्यात आला .. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे
बस च्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना सोयगाव आगारचा चालक आणि वाहक ने बस न थांबवता तब्बल अर्धा किलोमीटर पर्यत आठ ते नऊ प्रवाशांना पळायला लावले ही घटना सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे घडली. सोयगाव आगाराची MH20 BL 2199 बनोटी ते सोयगाव बस चालकाच्या उर्मटपणा पाहायला मिळाला त्यामुळे मात्र ग्रामीण भागातल्या प्रवाशांसाठी जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परी साठी अर्धा किलोमीटर पळावे लागले.
Marathi Sahitya Sammelan : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड राज ठाकरे करणार आहेत.
दिल्लीत ७० वर्षांनी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सरहद संस्थेला मिळाला आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित या साहित्य संमेलनासाठी सरहद संस्थेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला.
त्यातून संमेलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोधचिन्हाची निवड मनसेचे राज ठाकरे करणार असून त्यांच्याच हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.