मायक्रोसॉफ्ट
Microsoft Saam Tv

Pune News : मायक्रोसॉफ्टचा हिंजवडीसाठी मोठा प्लॅन, ५२० कोटींमध्ये खरेदी केली १६ एकर जागा, पुण्यात नोकऱ्या वाढणार!

Microsoft Buys Land in Pune : पुण्यामध्ये मायक्रोसॉफ्टने मोठी गुंतवणूक केलीय. त्यांनी १६ एकर जमीन खरेदी केल्याची माहिती मिळतेय.
Published on

मुंबई : अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे जमिन खरेदी केलीय. या डीलमधून सरकारच्या खात्यात ३१ कोटींहून अधिक रक्कम जमा झालीय.

जगातील दुसरी सर्वात मोठी मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात मोठा जमीन करार केला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार मायक्रोसॉफ्टने (Microsoft Buys 520 Land in Pune) हिंजवडी येथे ५१९.७२ कोटी रुपयांना जमीन खरेदी केलीय. देशातील प्रमुख आयटी हबमध्ये पुण्याचा समावेश होतो. अलिकडच्या मायक्रोसॉफ्टने भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवली आहे.

मायक्रोसॉफ्टची पुण्यात मोठी गुंतवणूक

मायक्रोसॉफ्टची भारतात अनेक डेटा केंद्रे, विकास केंद्रे आणि कार्यालये आहेत. मायक्रोसॉफ्ट ही जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी (Pune News) आहे. अॅप्पवनंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. मंगळवारच्या बंद किंमतीला कंपनीचे मार्केट कॅप $३.०७८ ट्रिलियन आहे, अशी माहिती बिझनेस स्टॅंडर्डनुसार मिळतेय.

मायक्रोसॉफ्टच्या भारतीय युनिट मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे १६.४ एकर जमीन खरेदी (Microsoft Buys Land in Pune) केलीय. हा करार ऑगस्टमध्ये झाला होता. कंपनीने ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीकडून खरेदी केलीय. या करारावर ३१.१८ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.

मायक्रोसॉफ्ट
Microsoft Outage At Mumbai Airports : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसचा सेलिब्रिटींना फटका, अर्जन रामपालही मुंबई विमानतळावर तासभर अडकला

१६ एकर जमीन खरेदी केली

कंपनीने २०२२ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये २५ एकरचा भूखंड ३२८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. यावर्षी त्यांनी हैदराबादमधील ४८ एकर जमिनीसाठी २६७ कोटी रुपये दिले होते.मायक्रोसॉफ्ट भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार (Microsoft Buys Land) करत आहे. जमीन खरेदी करणे हा त्याचाच एक भाग आहे. कंपनीने यापूर्वीच पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे डेटा सेंटर तयार केले आहेत.

सध्या कंपनीचे भारतात २३,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीची बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे कार्यालये आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने भारतात एक प्रमुख कौशल्य उपक्रम सुरू केला. या अंतर्गत २०२५ पर्यंत २० लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्ये प्रशिक्षित करण्याची योजना आहे.

मायक्रोसॉफ्ट
Microsoft Outage At Mumbai Airports : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसचा सेलिब्रिटींना फटका, अर्जन रामपालही मुंबई विमानतळावर तासभर अडकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com