Mumbai -Ahmedabad Bullet Train Saam Tv
मुंबई/पुणे

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

Mumbai- Ahmedabad Bullet Train: मुंबईकरासांठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयिस्कर होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबईतील दोन मेट्रो जोडल्या जाणार आहेत.

Priya More

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर आणि जलद होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबईतील २ मेट्रो जोडल्या जाणार आहेत. मेट्रो-३ किंवा अॅक्वा लाईन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बोगद्याद्वारे आणि २बी फूट ओव्हरब्रिजद्वारे जोडले जाण्याची शक्यता आहे.

देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला दोन मेट्रो जोडले जाणार आहे. हे एकत्रिकरण राष्ट्रीय हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (NHSRCL) नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यासारख्या शहरी वाहतूक संस्थांच्या समन्वयाने संयुक्त प्रयत्न केले जाणार आहे.

बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो-३ शी कशी जोडली जाईल?

मेट्रो-३ उत्तरेकडील आरेला दक्षिणेकडील कफ परेडशी जोडते, ज्यामुळे मुंबई एअरपोर्ट, उपनगरीय रेल्वे नेटवर्क आणि शहराच्या अंतर्गत कॉरिडॉरशी महत्त्वाचे दुवे मिळतात. प्रवाशांनी सुसज्ज असलेला १.१ किमी लांबीचा भूमिगत बोगदा बुलेट ट्रेन स्टेशन आणि मेट्रो लाईन-३ च्या कोटक-बीकेसी स्टेशनला जोडेला जाण्याची शक्यता आहे. हा बोगदा मुंबईतील चर्चगेट आणि सीएसएमटी येथील विद्यमान सबवेच्या धर्तीवर बनवला जाईल. ज्यामध्ये अधिक सोयीसाठी दुकाने असतील. जवळच्या पादचाऱ्यांसाठी असलेल्या चार वेस्टिब्युल्समधून प्रवेश सुलभ केला जाईल. या बोगद्याचा खर्च अंदाजे १०० ते १५० कोटी रुपये इतका येण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन मेट्रो-२बी शी कशी जोडली जाईल?

मेट्रो लाईन-२बी डीएन नगर ते मंडाले पर्यंत जाते. हे एफओबी मेट्रो लाईन-२बीच्या आयएल अँड एफएस स्टेशनला जोडेल. हे बुलेट ट्रेन टर्मिनलच्या रोड-लेव्हल कॉन्कोर्सपासून सुरू होईल. जे फक्त ५० मीटर अंतरावर असलेल्या मेट्रो लाईन-२बीच्या स्टेशनकडे जाईल. हे एफओबी पहिल्या-शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करते. विशेषतः याचा फायदा लांब पल्ल्याच्या बुलेट आणि शहर-व्यापी मेट्रो नेटवर्कमध्ये सामान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी होणार आहे. सध्या बुलेट ट्रेनच्या ठिकाणी उत्खनन आणि बांधकाम जोरात सुरू आहे.

परदेशात काय केले गेले आहे?

इटलीने मिलान आणि रोममध्ये अशाच प्रकारचे प्रोजेक्ट सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील चारही हाय-स्पीड रेल्वे स्थानकांचे बांधकाम पूर्ण वेगाने सुरू आहे. त्यापैकी सर्वात मोठे कॉम्प्लेक्स मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) स्टेशन - जमिनीपासून १०० फूट खाली बनवले जात आहे. ज्यामुळे ते या मार्गावरील सर्वात खोल स्टेशन बनले आहे.

मुंबई- अहमदाबाद मार्गावर किती स्थानके असणार?

महाराष्ट्रातील विरार बुलेट ट्रेन स्टेशनवरील बांधकामाने ९ मोठ्या काँक्रीट स्लॅबपैकी पहिला स्लॅब टाकून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई आणि अहमदाबाद या दोन आर्थिक शहरांना जोडणारा हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. ५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पात १२ स्थानके असणार आहेत. महाराष्ट्रात चार स्थानके आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर यांचा समावेश आहे. तर गुजरातमध्ये ८ स्थानके आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे. मुंबईतील बीकेसी हे कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्थानक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT