Shruti Vilas Kadam
कतरिनाने आणि विकी कौशल यांनी २३ सप्टेंबर रोजी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली.
कतरिना सध्या ४२ वर्षांची असून, वयाच्या चाळिशीत आई होण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. पण ती पहिली नाही जिने वयाच्या चाळीशीत आई होण्याचा निर्णय घेतला.
करीना कपूरने वयाच्या ३६ व्या वर्षी पहिल्यांदा आणि नंतर वयाच्या चाळिशीत (२०२१ मध्ये) दुसरा मुलगा जेहला जन्म दिला आहे.
बिपाशा बासूने वयाच्या ४३ व्या वर्षी मुलगी जन्म दिली होती.
दिया मिर्झाने वयाच्या ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला होता.
नेहा धूपिया यांनी ४० वर्षाच्या वयानंतर आपली मुलगी गुरीक यांना जन्म दिला.
फराह खानने वयाच्या ४३ व्या वर्षी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिप्लेट्सना जन्म दिला.